रोजगार सहाय्यक यांची दिवाळी अंधारात
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामपंचायत लेवल वर काम करणाऱ्या राम रोजगार सहायकांची दिवाळी यंदा अंधारातच साजरी होणार असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.दिनांक 3 ऑक्टोंबर 2024 रोजी शासनाने ग्रामरोजगार सहायकांना फिक्स मानधन आठ हजार रुपये देण्याचा जीआर काढला परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी रोजगार सहाय्यकांच्या संघटना उपोषण धरणे आंदोलन यासारखे आंदोलने करत आहेत परंतु याचा परिणाम शासनावरती काहीच होताना दिसत नाही शासनात करते व अधिकारी फक्त चालढकल करीत आहेत वेगवेगळी कारणे देत आहेत. फिक्स मानधन राहिले पण त्यांच्या पूर्वीच्या टक्केवारीची सुद्धा मानधन अद्याप रोजगार सेवकांना सहाय्यकांना मिळालेली नसल्यामुळे आईंनी वणीच्या सणासुदीसाठी खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नसल्याने त्यांची दिवाळी अंधारात होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे