
वन्यजीव सप्ताहानिमित्त सर्प जनजागृती कार्यक्रम संपन्न . . .
किसळ (ता. मुरबाड, जि. ठाणे), दि. ५ ऑक्टोबर २०२५ —
वन्यजीव सप्ताहानिमित्त ग्रामपंचायत किसळ व जैवविविधता व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता राजमाता जिजाऊ सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, किसळ येथे सर्प जनजागृती व वन्यजीव संवर्धन विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच डॉ. कविता वरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री. जगदीश भालके, सचिव, ग्रंथालय व्यवस्थापन समिती यांनी केले आणि आभार प्रदर्शन जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. वैष्णवी पडवळ यांनी केले.
निसर्ग विज्ञान संस्था, डोंबिवली चे सदस्य श्री. दिलीप श्याम राहुरकर आणि वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो ( WCCB ) स्वयंसेवक श्री. वैभव पद्माकर कुलकर्णी यांनी सरीसृप वर्गातील विविध प्रजातींबाबत माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख, सर्पदंश टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे योग्य प्रथमोपचार याबाबत सविस्तर माहिती सादर केली.
या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी, मुरबाड यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री. नारायण भांगरे (दादा), वनपाल, यांनी वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व पटवून दिले व उपस्थित ग्रामस्थांना वन्यजीव संवर्धनाचे सामाजिक उत्तरदायित्व समजावून सांगितले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वन्यजीव संवर्धनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आल .
https://youtu.be/SRMWrNaeWT8?si=EQCFJT1e991ufeCq