logo

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तहसील कार्यालयात भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

अव्वल कारकून कैलास पाटील यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

जळगाव – मुक्ताईनगर तहसील कार्यालयात "संजय गांधी योजना" आणि इतर शासकीय कामांसाठी लागणाऱ्या एफिडेविटसाठी नागरिकांकडून अनधिकृतपणे पैसे घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अव्वल कारकून कैलास पाटील यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये ते एफिडेविटसाठी सही व शिक्क्यांच्या बदल्यात रोख रक्कम स्वीकारताना दिसत आहेत.स्रोतांनी सांगितले की, हा प्रकार फक्त कैलास पाटील याच्यापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण कार्यालयात खाजगी एजंट व अधिकाऱ्यांमध्ये अवैध आर्थिक व्यवहारांचे जाळे तयार झाल्याचे दिसते. नागरिक स्वतः एफिडेविटसाठी जात नाहीत, तर एजंट्स त्यांचे काम करत असतात आणि त्यानंतर "साहेबांना पैसे द्यावे लागतात" अशी कारणे देऊन मोठ्या प्रमाणावर पैसे घेण्यात येतात. हे पैसे एजंट्स अधिकारी किंवा लिपिकांना पोहोचवतात.नायब तहसीलदार यांचा टेबल जवळ असूनही, हा प्रकार त्यांना लक्षात का येत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.स्थानिक तहसीलदार गिरीष वखारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांनी कैलास पाटील यांचा व्हिडीओ पाहिला आहे आणि त्यातील तथ्यांची संपूर्ण पडताळणी करून नंतर पुढील निर्णय घेतला जाईल.ही बाब गंभीर असून त्यावर वेगाने आणि प्रभावी कारवाई अपेक्षित आहे.

11
1488 views