logo

अतिवृष्टी परतुर विधानसभा मतदारसंघासाठी 100 कोटी रुपये मंजूर; आ. लोणीकर. (AIMA -प्रतिनिधी भाऊसाहेब पाटील मुके)

अतिवृष्टी अनुदानाचे परतुर विधानसभा मतदारसंघासाठी 100 कोटी रुपये मंजूर; डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार - आमदार बबनराव लोणीकर यांची माहिती

कार्यकर्ता हीच भाजपाची ताकद; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचाच झेंडा फडकेल – आमदार बबनराव लोणीकर

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा संघटनबांधणीसाठी विशेष मोहिम राबवणे आवश्यक – आमदार बबनराव लोणीकर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या, पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक – आमदार बबनराव लोणीकर

निवडणुकीत गाफिल राहून चालणार नाही, निवडणूक गांभीर्याने घेणे आवश्यक - आमदार बबनराव लोणीकर

मंठा शहरात दलित वस्ती अंतर्गत एक कोटी २० लाख रुपयांच्या विकास कामाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते भूमिपूजन


प्रतिनिधी -
भाजपचा खरा आत्मा हा कार्यकर्ता आहे. भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. प्रत्येक निवडणूक ही संघटन, नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागातूनच जिंकली जाते. त्यामुळे आता केवळ घोषणांवर नव्हे, तर कृतीवर भर द्यावा लागेल. भारतीय जनता पक्षाची खरी ताकद ही पक्षाचे निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मेहनतीच्या बळावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपाचाच झेंडा फडकेल, त्यासाठी भाजपाच्या संघटनात्मक मजबुतीवर भर देणे आवश्यक असून कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून काम करणे अपेक्षित आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कोणतीही निवडणूक ही संघटन आणि स्थानिक पातळीवरील मजबूत संपर्कावर जिंकता येते. त्यामुळे येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद सह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपाचाच विजय होणार आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले.

मंठा तालुका व नेर सेवली सर्कल मधील लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आमदार बबनराव लोणीकर बोलत होते ती यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. या निवडणुकांमध्ये पक्षाच्या यशासाठी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. रोजच्या जीवनात जनतेला भेडसावणाऱ्या समस्या पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज, नोकरीच्या संधी यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. या प्रश्नांवर ठोस उपाययोजना आणि कामगिरी मांडली, तर जनता आपल्याला पाठिंबा नक्की देईल. केवळ निवडणुकीच्या वेळी प्रचार करून चालणार नाही. वर्षभर कार्यकर्ते जनतेच्या संपर्कात राहिले पाहिजेत. त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या पाहिजेत. हीच भाजपची कार्यपद्धती आहे. भाजपचा उद्देश केवळ सत्ता मिळवणे नाही, तर पारदर्शक आणि जनहितकारी प्रशासन देणे हा आहे. स्थानीय स्वराज्य संस्थांमधून आपण हे मॉडेल उभारू शकतो, याची जनता आत्मविश्वासाने जाणीव करून देईल.

अतिवृष्टी अनुदानाचे परतुर विधानसभा मतदारसंघासाठी 100 कोटी रुपये मंजूर; डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार
परतूर विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून ₹100 कोटींचा अनुदान निधी मंजूर करण्यात आला असून, हा निधी डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असल्याची माहिती आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली. या संदर्भात माहिती देताना आमदार लोणीकर म्हणाले की, या वर्षी परतूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना वेळेवर आणि थेट आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला आहे. ₹100 कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्याचे वाटप लवकरच सुरू होईल. यामध्ये मंठा तालुक्यातील 71303 तर परतूर तालुक्यातील 53,732 अशा एकूण 125035 शेतकऱ्यांना 93 कोटी 05 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अतिवृष्टी दरम्यान मंठा तालुक्यातील 54614 तर परतूर तालुक्यातील 51631 असे एकूण 106295 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. तर नेर वसई सर्कलमध्ये 7 कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी निधी मंजूर करण्यात आला आहे

डिबीटी प्रणालीमुळे पारदर्शकता आणि वेग; तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा
या निधीचे वितरण डिबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार असल्यामुळे कोणतीही मध्यस्थी न करता रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे पारदर्शकता आणि वेग या दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत. या निधीतून परतूर विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल आर्थिक मदत मिळणार आहे. पीक नुकसानीचा पंचनामा पूर्ण झालेला असून त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना लवकरच निधी मिळणार आहे. शेतकरी संकटात असताना सरकार त्याच्या पाठीशी उभे आहे, हे या निर्णयातून दिसून येते. केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे आमचे धोरण आहे. असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

संघटनबांधणीसाठी विशेष मोहिम-
भाजपच्या आगामी कार्यक्रमांची माहिती देत त्यांनी सांगितले की, लवकरच सर्व मंडळ पातळीवर बैठका घेऊन निवडणुकीसाठी नियोजन केले जाईल. नव्या सदस्यांची भरती, बूथ समित्यांचे बळकटीकरण, आणि मतदारांशी थेट संवाद यावर भर दिला जाणार आहे. भाजपचा विजय सुनिश्चित करण्यासाठी केवळ प्रचारापुरते नव्हे, तर मजबूत संघटनबांधणी ही काळाची गरज आहे. बूथस्तरावर कार्यकर्ता पोहोचला पाहिजे, मतदारांशी थेट संपर्क झाला पाहिजे, तरच आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकू शकतो, असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.

विशेष मोहिम राबवण्याचे संकेत-
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप संघटनेत विशेष मोहिम राबवण्यात येणार असून, बूथ पातळीवरील संघटन बळकटीकरण, नवीन सदस्य नोंदणी आणि प्रशिक्षण, सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, जनसंपर्क मोहिम आणि घरभेटी, विकासकामांचा आढावा आणि जनतेचा विश्वास याविषयावर भर देणे आवश्यक आहे. या बैठकीत त्यांनी स्थानिक समस्या, विकासकामे आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळगाळापर्यंत पोहोचवण्याबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निवडणुकीपूर्वीच विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. जनतेचा विश्वासच आपल्या विजयाची गुरुकिल्ली आहे, मतदारांना सरकारच्या कामांचा आणि विकास योजनांचा थेट लाभ झाल्याचे जाणवले पाहिजे. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे समर्पण हेच भाजपच्या विजयाचे गमक आहे, असेही आमदार बबनराव लोणीकर म्हणाले.

निवडणुकीत गाफिल राहून चालणार नाही, निवडणूक गांभीर्याने घेणे आवश्यक - आमदार बबनराव लोणीकर
निवडणुकीत गाफिल राहून चालणार नाही. ही केवळ एक औपचारिक प्रक्रिया नसून, आपल्या भविष्यासाठी आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीकडे पूर्ण गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सजग आणि सक्रिय राहण्याचा सल्ला दिला. कार्यकर्ता हीच भाजपाची खरी ताकद आहे. प्रत्येक गाव, प्रभाग आणि बूथ पातळीवर कार्यकर्त्यांनी सजग भूमिका बजावली, तर कोणतीही निवडणूक आपण आत्मविश्वासाने जिंकू शकतो. अनेकदा स्थानिक निवडणुकीकडे दुर्लक्ष केले जाते, पण याच निवडणुका जनतेच्या दररोजच्या गरजांशी निगडित असतात. या निवडणुकांमधूनच आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

मंठा शहरात दलित वस्ती अंतर्गत 1 कोटी 20 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन – आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते संपन्न
मंठा शहरातील विविध दलित वस्ती अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 1 कोटी 20 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या विकासकामांमध्ये सिमेंट रस्ते तसेच स्मशानभूमी कंपाउंड वॉल व गेट आदी कामांचा समावेश आहे. विशेषतः अनुसूचित जाती वस्तीतील नागरिकांच्या मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी ही कामे हाती घेण्यात येत आहेत. विकास कोणत्याही समाजापुरता मर्यादित नसतो. दलित वस्तीतील नागरिकांनीही चांगल्या रस्त्यांचा, स्वच्छतेचा, पिण्याच्या पाण्याचा आणि सुरक्षिततेचा अनुभव घ्यायला हवा. ही कामे त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला पात्र ठरवणे आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे ही आमची जबाबदारी आहे. दलित वस्ती काम नेहमी दुर्लक्षित राहिले, पण आम्ही हे चित्र बदलत आहोत असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी म्हटले आहे.

यावेळी अंकुशराव बोराडे उत्तमराव राठोड अंकुशराव अवचार संदीप भैया गोरे गणेशराव खवणे सतीशराव निर्वळ नितीन राठोड बाबुराव शहाणे पंजाबराव बोराडे विक्रम उफाड वैजनाथ बोराडे कैलास बोराडे राजेश मोरे विलास घोडके आनंद जाधव विकास पालवे नरसिंग राठोड ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव ऍड. उत्तमराव राठोड गजानन देशमुख श्रीनिवास देशमुख दीपक बोराडे नाथराव काकडे विठ्ठलराव काकडे सुरेशराव सरोदे विकास सूर्यवंशी शरद पालवे अमोल मोरे नितीन सरकटे दारासिंग चव्हाण रामकिसन बोडखे किशोर हनवते मोहनराव आढे गजानन उफाड विवेक काकडे सचिन राठोड रमेश वायाळ बाळासाहेब चव्हाण माऊली गोंडगे राजेभाऊ खराबे कैलास चव्हाण तानाजी शेंडगे दीपक दवणे स्वरूप सानप राजेश मस्के यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

2
376 views