logo

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ ची बैठक संम्पन्न

आज अ.भा.मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या जुहू, मुंबई कार्यालयात चित्रपट निर्माता यांची "मल्टिप्लेक्स थिएटर" संदर्भात "महाराष्ट्र शासन" यांचेकडे कोणत्या महत्वाचे प्रश्न मांडायचे आणि सुलभपणे सोडवायचे याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
याप्रसंगी डावीकडून अविनाश जाधव (निर्माता), विजय राणे (दिग्दर्शक), सतिश रणदिवे (अ.भा.म.चित्रपट महामंडळ), दिनेश आशिवाल (जनरल सेक्रेटरी, वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोडयुसर्स असोसिएशन), राजेंद्र बोडारे(संपादक, फिल्म रफ्तार), दिपक कदम (निर्माता दिग्दर्शक), विजय पाटकर(अभिनेता निर्माता दिग्दर्शक), संजीव नाईक, डॉ. सुहास राणे, दिपाली सय्यद(अभिनेत्री निर्माती ), ॲड. मोहनराव पिंपळे (वाणिज्य दूत, म्यानमार / मानद अध्यक्ष, अ.भा.म.चि.निर्माता महामंडळ), संग्राम शिर्के (अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोडयुसर्स असोसिएशन, देवेंद्र मोरे (अध्यक्ष, अ.भा.म.चित्रपट निर्माता महामंडळ), शरद शेलार(निर्माता), बाळासाहेब गोरे (कार्याध्यक्ष, अ. भा. मराठी चित्रपट निर्माता महामंडळ), प्रकाश जाधव(निर्माता दिग्दर्शक), आणि मनोहर सरवणकर (दिग्दर्शक)
यांनी आपापले मत नोंदवले आहे.
सर्वानुमते खालील प्रमाणे निर्णय शासनाने घ्यावा असे ठरले
1) तीन पेक्षा जास्त थिएटर असलेल्या मल्टिप्लेक्स ठिकाणी एक मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपटांचे कायमस्वरूपी असावे.
2) मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट ट्रेलर पंधरा दिवस आधीपासून विनामूल्य दाखवावेत.
3) मल्टिप्लेक्स तिकीट दर मराठी करीता शंभर रूपये असावा.
4) मराठी चित्रपट रिलीज होण्याची तारीख आणि शो याबाबत निश्चिती दहा दिवस आधी मिळावी.
5) मराठी चित्रपट स्टॅंडी, पोस्टर्स दहा दिवस आधी थिएटरमध्ये आगामी आकर्षण म्हणून दर्शनी भागात लावावीत.
6) मराठी चित्रपट निर्माते‌ , कलाकार, तंत्रज्ञ यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून मराठी चित्रपटसृष्टीची भरभराट करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.
असे ठराव अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांनी बोलावलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आले.

23
1370 views