स्व आशा बहुद्देशीय संस्था, चुरणी तर्फे समाजसेवेसाठी स्वयंसेवकांची भरती.......?
चुरणी (प्रतिनिधी) –स्व आशा बहुद्देशीय संस्था, चुरणी तर्फे विविध सामाजिक उपक्रमांसाठी उत्साही व जबाबदार स्वयंसेवकांची भरती सुरू करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत.संस्थेचे पदाधिकारी यांनी सांगितले की, समाजातील तरुण व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन समाजासाठी योगदान द्यावे. स्वयंसेवकांना प्रशिक्षण, अनुभव तसेच प्रमाणपत्र दिले जाणार आहे.इच्छुकांनी संस्थेच्या कार्यालयात किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधावा.📞 संपर्क: 7498795667📧 ई-मेल: hzadkhande@gmail.comस्व आशा बहुद्देशीय संस्था, चुरणी यांच्या वतीने समाजसेवेसाठी कार्य करण्याची ही एक उत्तम संधी असल्याचे संस्थेच्या सचिव हितेंद्र जी झाडखंडे सांगितले.