logo

विरदेल येथे देवकर विद्यालयात "वाचन प्रेरणा दिवस" मोठ्या उत्साहात साजरा...

(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

विरदेल जिल्हा धुळे येथील श्रीमंत गो. सं.देवकर विद्यालय येथे भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला
याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी देवकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जे एस पाटील सर,विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एस एस गोसावी सर व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री आर एच ठाकूर सर , श्री जी एन बेहेरे सर , श्री वाय डी जोशी सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होते.
'चला वाचूया स्वतःला घडवूया' या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी अग्निपंख,...WINGS OF FIRE,..कलाम सर के सक्सेस के पाठ या पुस्तकांचे थोडक्यात वाचन शाळेचे विद्यार्थी जयदीप सोमवंशी,रोहित बेहेरे,चिन्मय चौधरी व काव्यांजली पवार ह्या विद्यार्थ्यानी केले व सर्व विद्यार्थ्यांना वाचन संकल्प सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच येणाऱ्या दिवाळी सुट्टीत कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन व परीक्षण करून एका कागदावर लिहून जमा करण्यात यावे यासाठी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे ग्रंथालय विभागाचे प्रमुख श्री सुनिल चौधरी सर व आभार प्रदर्शन विद्यालयातील स्काऊट मास्टर श्री सी एस निकम सर यांनी केले.

33
911 views