logo

कोभंळी गणातून भाजप कडून पंचायत समिती लढविण्यास अनुपमाताई शेलार सज्ज

प्रतिनिधी १५ ऑक्टोबर (अहिल्यानगर) :- कोण आहेत अनुपमा शेलार ,जाणून घेऊयात अनुपमा शेलार ह्या मानव सेवा मंडळ संचलित नागेश्वर विद्यालय थेरगाव चे संस्थापक प्रा.विश्वनाथ जोगदंड यांच्या बहिण आहेत तसेच भारत न्यूज मराठी चा मुख्य चेहरा व संपादक तसेच शिव शंभो प्रतिष्ठान चे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आर.जे ऋषि शेलार यांच्या आई आहेत ,आर.जे ऋषि यांचा खूप मोठा दांडगा जनसंपर्क आहे . खांडवी,कौडाणे,चांदे,रवळगाव, गुरव पिंपरी,थेरगाव,मांदळी, निमगाव, रमजान चिंचोली,अशा कोंभळी गणातील विविध गावात अनुपमा शेलार यांचे नातेवाईक सोयरे आहेत त्यामुळे त्या विक्रमी मतांनी निवडून येणार यात तिळ मात्र शंका नाही, तसेच त्यांचे बंधू संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ जोगदंड म्हणाले कि यावेळी अनुपमा ला निवडून आणण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करु पण काहीही झाले तरी अनुपमा ला निवडून आणू कारण अनुपमाताई सारखा सुशिक्षित उमेदवार निवडून खूप गरजेचे आहे असं विधान संस्थापक विश्वनाथ जोगदंड यांनी केले आहे.मध्यंतरी धाराशिव जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनुपमा शेलार या थेट धाराशिव ला गेल्या होत्या तिथे त्यांनी पुरग्रस्त शेतकर्यांचे विविध प्रश्न मांडले होते व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत करा अशी ही मागणी केली होती दरम्यान अनुपमा शेलार या नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात ,त्याचे चिरंजीव आर.जे ऋषि शेलार यांनी शिव शंभो प्रतिष्ठानच्या माध्यमातून धाराशिव व नाशिक जिल्ह्यातील पुरग्रस्त महिलांना स्वखर्चाने एक हजार साड्या माहेरची भेट म्हणून वाटल्या होत्या, परंतु हि संकल्पना हि अनुपमा शेलार यांचीच होती, ऋषि शेलार नेहमी म्हणत असतात मी हितपर्यंत पोहचलो आहे ते म्हणजे माझ्या आई च्या मार्गदर्शनामुळे मी जे एवढा सुंदर बोलतो ते सगळं मला बोलायला शिकविणारी माझी आई आहे.दरम्यान ऋषि शेलार यांनी एक भन्नाट किस्सा सांगितला आहे ते म्हणाले मी मिस्टर ब्युटिफुल इंडिया या मॉडेलिंग शो 2025 चा विनर झालो ते केवळ माझ्या आई मुळेच,त्याच झालं असं मी पंचाब हरियाणा ची तगंडी तंगडी बॉडी बिल्डर कंस्टेंट पोर पाहिली व माझ्या लक्षात आले यांच्या पुढे मि जिंकू शकत नाही त्यामुळे मी सौंदर्य स्पर्धेतून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला आणि आईला सर्व हकिकत सांगितली,त्यावर मला माझी आई अनुपमा ताई शेलार असे म्हणाल्या तु अजिबात स्पर्धेतून बाहेर निघायचे नाही, स्वतः मध्ये आत्मविश्वास ठेव समोर कोणीही येऊ दे फक्त तुझी परिस्थिती शी लढायची ताकद ठेव असे म्हणत आई ने माझा आत्मविश्वास जागा केला आणि मी मिस्टर ब्युटिफुल इंडिया या मॉडेलिंग शो चा विनर झालो, ते केवळ आणि केवळ माझ्या आई मुळेच,जी माझ्या माझ्या सारख्या मुलांचे मनोबल वाढवते माझ्यातला आत्मविश्वास जागा करते ,त्यामुळे ती समाजासाठी लढू शकते सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मांडू शकते आणि गोरगरिबांना न्याय देऊ शकते शेवटी शांता बाई शेळके आपल्या खांब कवितेत जसं म्हणतात की एक बाई जसं आपल्या घराचा डोलारा अगदी एका मजबूत खांबाप्रमाणे व्यवस्थित सांभाळते , तसेच ती समाजकारण आणि राजकारण पण सांभाळू शकते.भाजपा हा सर्व सामान्य, कष्टकरी, शेतकरी आणि गोरगरिब जनतेचा पक्ष आणि त्या पक्षा अंतर्गत मला नक्कीच काम करायला आवडेल जनसामान्यांच्या समस्या सोडवायला आवडेल ,असं विधान शेलार यांनी केले आहे.तसेच अनुपमा शेलार या सभापती मोहदय राम शिंदे यांच्या कट्टर समर्थक आहेत , विशेष म्हणजे अनुपमा शेलार/चांदेकर या पुर्वी मानव सेवा संरक्षण संघटन च्या अहमदनगर जिल्ह्याच्या महिला प्रकोष्ठ पदाधिकारी होत्या त्यावेळी ही त्यांनी चांगली कामगिरी केली व जनसमान्यांना न्याय दिला,अनुपमा शेलार चांदेकर ह्या सध्या भारत न्यूज नेटवर्क च्या संपादक हेड प्लॅनरच्या मुख्यसंपादिका म्हणून काम पहात आहेत ,या शिवाय त्या सभापती राम शिंदे साहेब यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यां आहेत, एकूण सर्व बाबींचा विचार करता अनुपमा शेलारच निवडून येतील यात काडीमात्र शंका नाही.विशेष म्हणजे चांदे खुर्द हे त्यांचे माहेर आहे त्यामुळे त्यांना खुंरगेवाडी आणि दोन्ही चांदे मधून एक शिक्का मतदान होण्याची शक्यता आहे.

51
4497 views