logo

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर — ७३ गटांपैकी ३७ गट महिला प्रवर्गासाठी राखीव

पुणे -
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. एकूण ७३ गटांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून, त्यापैकी ३७ गट महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
आरक्षण प्रक्रिया चक्रानुक्रम पद्धतीनुसार (Rotation System) पार पडली. अनुसूचित जाती (SC) साठी 7, अनुसूचित जमाती (ST) साठी 5, ओबीसी साठी 19 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 42 गट निश्चित झाले आहेत.
सोडतीदरम्यान काही तक्रारी आल्या, विशेषतः भिगवण गटाऐवजी लोणी काळभोर गटाचा समावेश केल्याबाबत आक्षेप घेण्यात आला. काही नेत्यांचे पारंपरिक गट आरक्षित झाल्याने त्यांची निवडणूक समीकरणे बदलली आहेत.
या आरक्षणामुळे महिलांच्या राजकीय सहभागात मोठी वाढ अपेक्षित आहे. विविध पक्षांनी आता नव्या गटांनुसार उमेदवारीची तयारी सुरू केली असून, ग्रामीण राजकारणात नव्या समीकरणांची चुणूक दिसू लागली आहे.

23
1069 views