logo

शिंदरखेड्यात प्रभाग क्र. ४ च्या सुधारित यादीत घोळ व अनियमितता; मनसे जिल्हाउपाध्यक्ष श्री.स्वप्निल सोनार यांची हरकत

शिंदरखेड्यात प्रभाग क्र. ४ च्या सुधारित यादीत घोळ व अनियमितता; मनसे जिल्हाउपाध्यक्ष श्री.स्वप्निल सोनार यांची हरकत
(शिंदखेडा प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा- येथील प्रभाग क्रमांक ४. मतदार यादी भाग क्रमांक १४४ मध्ये नुकत्याच झालेल्या हसीलन सुधारीत यादीत अनियमितता व घोळ झाल्यबद्दल मनसे कामगार सेना जिल्हाउपाध्यक्ष स्वप्नील सोनार यांनी शिंदखेडा नगरपंचायतीकडे लेखी हरकत घेऊन आक्षेप नोंदविला आहे. हरकतीत पुढील मुद्यांचा समावेश आहे.
सुधारित मतदार यादीमध्ये इतर प्रभागांतील (विशेषतः प्रभाग क्र. ३, ५, ६, ७, ८, ११. १३ व १४) मोठ्या संख्येने मतदारांचा समावेश अचानकपणे प्रभाग क्रमांक ४ मध्ये करण्यात आला आहे. २०२४ मधील विधानसभा/लोकसभा निवडणुका आणि त्यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मध्ये मतदारांची संख्या सुमारे १२०० इतकी होती. नवीन मतदार यादीत ७०९ हुन अधिक मतदारांनी अचानक वाढलेली दिसत आहे.
या वाढलेल्या ७०९ हून अधिक मतदारांपैकी बहुसंख्य मतदार हे विशिष्ट मुस्लिम समुदायाचे आहेत. मुस्लीम समाज बांधव यांना विरोध नाही परंतु ते ज्या प्रभागात येतात त्यांनी त्या ठिकाणी मतदान करावे. तसेच निधन झालेल्या मतदारांची नावे कमी करण्यात यावे.
कार्यकारी दंडाधिकारी, शिंदखेडा
यामुळे आगामी निवडणुकीत बोगस मतदान वाढण्याची आणि निवडणुकीच्या निकालावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वळावली आहे. वरील मुद्यांचा तहसीलदार व नगर पंचायत प्रशासनाने आठ दिवसाचा आत त्वरित दखल घ्यावी.
८ दिवसांच्या आत समाधानकारक व उचित कार्यवाही झाली नाही तर आमरण उपोषण करण्यात येऊन जन आंदोलन देखील छेडले जाईल होणाऱ्या परिणामास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मनसेचे श्री. स्वप्नील सोनार यांनी लेखी निवेदनातुन दिला आहे.

2
14 views
2 comment  
  • Umesh Bharat Patil

    Photo problem

  • Umesh Bharat Patil

    फोटो