logo

नाशिक येथील रमाबाई आंबेडकर वसतिगृहातील मुलींना दिवाळी निमित् ड्रेस व महिलांना साडी वाटप कार्यक्रम यशस्वी

शिवश्रध्दा जनसेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष व कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनच्या वतीने सोमवार दि. १३/१०/२०२५ रोजी संध्याकाळी ठिक ४.३० वाजता रमाबाई आंबेडकर मुलींचे वसतिगृह नेहरू गार्डन शालिमार नाशिक येथील मुलींना दिवाळीच्या निमित्ताने ड्रेस व महिलांना साड्या वाटप करण्यात आले तसेच कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनचे पदाधिकारी श्री विनोद भाऊ बिरारी यांच्या पत्नी गायत्री वहिंनी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलींना 250बिस्कीट पुडे दिलं 🙏 याप्रसंगी रमाबाई आंबेडकर मुलींचे वसतिगृहातील मुख्य श्री पी पी गायकवाड सर , सौ. बेबीताई, आयोजक सौ. श्रध्दाताई दुसाने, श्री सुनिल परदेशी, सौ. प्रिया भारते, श्री व सौ. जोशी ॲड कामिनी भानुवंशे मॅडम आदी उपस्थित होते या प्रसंगी श्रध्दाताई यांनी खुप छान असे कापडे ड्रेस मुलींना देऊन खरी गरिबीची दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करण्यासाठी एक छोटाशी भेट दिली आज एकवेळी 230मुलींना इतके छान कापडे दिले मुलींना आईची माया दिली खुप अभिमान वाटतो आज आमच्या ह्या भगिनी सौ.श्रध्दाताई दुसाने आपल्या कार्याला मानाचा मुजरा आज उपस्थित सर्व पदाधिकारी यांना खरेच खूप अभिमान वाटतो तुमचा आम्ही ह्या उपक्रमात सहभागी झालो कार्यक्रम प्रसंगी कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन वतीने दिवाळीमध्ये रमाबाई आंबेडकर वस्तीगृहाच्या सर्व मुलींसाठी वाहतूक जनजागृती वर चित्रकला स्पर्धा, संविधान विषयावर निबंध लेखन स्पर्धा , आणि गडकिल्ले संवर्धन निमित्ताने किल्ले बनवण्याची स्पर्धा अशा प्रकारे अतिशय सुंदर असा टास्क देण्यात आला आहे आणि त्यासाठी प्रथम तीन पारितोषिके पण देण्यात येणार आहेत, व सर्टिफिकेट देण्यात येणार अशाप्रकारे एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.मनापासून धन्यवाद ताईसाहेब 🙏🙏
आयोजक :-
सौ. श्रध्दाताई दुसाने
संस्थापक अध्यक्ष
शिवश्रध्दा जनसेवा फाऊंडेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष
कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन
माजी विश्वस्त
कपालेश्वर महादेव मंदिर संस्थान नाशिक

66
4306 views