अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 75 गटांचे आरक्षण जाहीर ! जाणून घ्या तुमच्या गटात कोण असेल उमेदवार
अहिल्यानगर:
अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडतीकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. ही प्रतिक्षा आज संपली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या सर्व गटांचे आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनेकांच्या मनाप्रमाणे आरक्षण निघाले तर काहींना इतर गट शोधावे लागणार आहेत.
जिल्हा परिषद गटाचे तालुका निहाय आरक्षण पुढील प्रमाणे अकोले तालुकाः समशेरपूर अनुसूचित जमाती, देवठाण-अनु. जमाती महिला, धामणगाव आवारी- सर्वसाधारण महिला, राजूर- अनु. जमाती, सातेवाडी- अनु. जमाती महिला, कोतुळ-अनुसूचित जमाती.
संगमनेर तालुकाः समनापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तळेगाव- सर्वसाधारण महिला, आश्वी बु.- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, जोर्वे- नागरिकांचा मागास प्रवर्ग, घुलेवाडी-सर्वसाधारण, धांदरफळ- सर्वसाधारण, चंदनापुरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, बोटा- अनु. जमाती महिला.
कोपरगाव तालुकाः सुरेगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब्राम्हणगाव- सर्वसाधारण, संवत्सर- सर्वसाधारण, शिंगणापूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पोहेगाव बु.- सर्वसाधारण महिला.
राहाता तालुकाः पुणतांबा-अनुसूचित जाती, वाकडी- अनुसुचित जाती, साकुरी - अनुसूचित जाती महिला, लोणी खु. - नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोल्हार बु.- सर्वसाधारण.
श्रीरामपूर तालुकाः उंदिरगाव- अनुसूचित जाती महिला, टाकळीभान- सर्वसाधरण महिला, दत्तनगर - अनुसूचित जाती, बलापूर बु.- अनुसूचित जाती महिला.
नेवासा तालुकाः बेलपिंपळगाव- सर्वसाधारण महिला, कुकाणा-सर्वसाधारण महिला, भेंडा बु.- सर्वसाधारण, भानसहिवरा-सर्वसाधारण, खरवंडी- सर्वसाधारण महिला, सोनई- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, चांदा- सर्वसाधारण महिला.
शेवगाव तालुकाः दहिगावने- सर्वसाधारण, बोधेगाव-सर्वसाधारण, भातकुडगाव- अनुसूचित जाती महिला, लाडजळगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
पाथर्डी तालुकाः कासार पिंपळगाव- सर्वसाधारण, भालगाव-सर्वसाधारण, तिसगाव- सर्वसाधारण, मिरी- सर्वसधारण महिला, टाकळीमानूर- सर्वसाधारण महिला.
अहिल्यानगर तालुकाः नवनागापूर- सर्वसाधारण महिला, जेऊर-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नागरदेवळे- अनुसूचित जाती महिला, दरेवाडी- अनुसूचित जाती महिला, निंबळक- नागरिकांचा मागास प्रवर्ग, वाळकी- नागरिकांचा मागास प्रवर्ग.
राहुरी तालुकाः टाकळीमियाँ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब्राम्हणी- सर्वसाधारण, गुहा- सर्वसाधारण, बारागाव नांदूर-अनुसूचित जमाती महिला, वांबोरी- सर्वसाधारण महिला.
पारनेर तालुकाः टाकळीढोकेश्वर- सर्वसाधारण महिला, ढवळपुरी- सर्वसाधारण महिला, जवळा- नागरिकांचा मागास प्रवर्ग, निघोज - नागरिकांचा मागास प्रवर्ग, सुपा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
श्रीगोंदा तालुका: येळपणे- सर्वसाधारण, कोळगाव-
सर्वसाधारण, मांडवगण- सर्वसाधारण महिला, आढळगाव-सर्वसाधारण महिला, बेलवंडी- सर्वसाधारण, काष्टी- नागरिकांचा मागास प्रवर्ग.
कर्जत तालुकाः मिरजगाव- सर्वसाधार, चापडगाव- सर्वसाधारण महिला, कुळधरण- नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोरेगाव-सर्वसाधारण महिला, राशीन- नागरिकांचा मागास प्रवर्ग.
जामखेड तालुकाः साकत- सर्वसाधारण, खर्डा- सर्वसाधारण, जवळा-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.