
*महत्वाची धोकादायक बातमी*
आत्माशक्ति नगर पस्थल " बोइसर "
तालुका/जिल्हा - पालघर (महारास्ट्र)
आत्माशक्तीनगर ला सर्वात धोका असलेली इमारत म्हणजेच *मराठे निवास*, सदर बिल्डिंग वर अवेधरित्या मोबाईल टॉवर मागील काही वर्षान आधी बसविण्यात आले होते , त्यास सर्व नागरिकांचा तीव्र विरोध असताना पैश्याच्या जोरावर, काही स्वार्थी लोकांच्या व स्वार्थी ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने सदर टॉवर बसविण्यात आले होते ज्याचा सर्वात मोठा धोका येथील रहिवासी भोगत आहेत त्यात बाजूला प्रदूषित MIDC म्हणजेच सर्वच बाजूने येथील नागरिक आरोग्याविषयी समस्येला बळी पडत आहेत.
आज ह्ये सांगायची गरज म्हणजे, आज ह्या मराठे निवास च्या मालकाने एका गरीब मजुरास येथे सुरक्षेची कोणतीही काळजी किंवा पूर्व सूचना न देता सदर गरीब मजुरास मरणाच्या दारात एकट्याला आज सकाळी सदर बिल्डींग वरील लोखंडी पाईप उतरविण्यास कामास लावले, सदर पाईप बिल्डींगवरुन उतरिवताना सदर पाईप बिल्डींग लागत अगदी २ फूट अंतरावर असलेल्या ३३Kv च्या लाईन टच झाला व क्षणातच सदर मजुरास विजेचा झटका लागून सदर व्यक्ती काही कोसळला व तडफडत होता, वेळीच आपल्या परिसरातील काही मुलांनी आकाश शेवाळे, जितेश संखे, मनोज कासव ह्यांनी वेळीच त्याला हॉस्पिटल मध्ये भरती केले , ह्या घटनेचा तीव्र निषेध सर्वच नागरिक करत आहेत, लवकरच ह्या विषयी संपूर्ण परिसरातून मोर्चा ग्रामपंचायत कार्यालय वर काढण्यात येईल.