logo

मुख्याध्यापक श्री धर्मेंद्र कोचे यांचा सत्कार

महाराष्ट्र शासनाचा “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार” प्राप्त धर्मेंद्र कोचे मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल साकोली यांचा सिद्धिविनायक स्कूल, गुमगाव येथे सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. रमेश वंजारी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अधिकारी संजीव झा, तसेच प्राचार्या अर्चना देवळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला श्री. धर्मेंद्र कोचे यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्री. धर्मेंद्र कोचे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “यश हे एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी सातत्य, चिकाटी आणि अपार मेहनत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील राहावे आणि शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करत प्रोत्साहित करावे.”कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रदीप नायर यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री.शितल डेकाटे यांनी मानले.

5
8 views