logo

मेडिकलमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर डॉ ज्ञानल सोनवणे यांचा उत्साहवर्धक सत्कार

मेडिकलमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर डॉ ज्ञानल सोनवणे यांचा उत्साहवर्धक सत्कार

अमळनेर प्रतिनिधी

आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळगाव येथील प्राचार्य तथा कलाशिक्षक श्री. नितीन सोनवणे यांची कन्या, कु. ज्ञानल सोनवणे यांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळवून गावाचा आणि कुटुंबाचा गौरव वाढवला आहे. गजेंद्रगड (कर्नाटक) येथील भगवान महावीर जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधील बी.ए.एम.एस. अभ्यासक्रम पूर्ण करून शेवटच्या वर्षात प्रथम क्रमांक मिळवून डॉ. ज्ञानल सोनवणे यांनी "डॉक्टर" होण्याचा मान प्राप्त केला आहे.

त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक नाही, तर कुटुंब, गाव आणि समाजासाठी अभिमानाचा क्षण आहे. अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि चिकाटी यामुळे ज्ञानल यांनी ही प्रतिष्ठा मिळवली असून, डॉक्टर या जबाबदारीच्या व्यवसायात पदार्पण करताना त्यांनी उचललेले पाऊल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे विद्या-सचिव प्रकाश पाटील, देवगांव देवळी हायस्कूलचे शिक्षक आणि पत्रकार ईश्वर महाजन यांनी ज्ञानल सोनवणे यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कलाशिक्षक श्री. नितीन लहानू सोनवणे व उपक्रमशील शिक्षिका सौ. नंदा बोरसे (सोनवणे) यांच्या कन्येचा हा गौरवाचा क्षण संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरतो.

0
46 views