logo

लॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याचे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश

लॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याचे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश

आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांला यश

सोलापूर : आज दि. 17 मे 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने व सर्व मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. जिल्हाधिकारी, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक सोलापूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर व संबंधितांची बैठक आयोजित केली होती.

संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे आपल्या सरकारने राज्यामध्ये कडक निर्बंध लागू केले आहे. सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार व इतर कामगार असून त्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर आहे. परंतू सध्याच्या लॉकडाऊनमुळे त्यांची रोजंदारी बंद असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. सदर महिलांनी त्यांचे दैनंदिन जीवन, उपजीवीका व विविध कारणास्तव बचत गटाच्या माध्यमातून मायक्रोफायनान्सकडून कर्ज घेतले आहेत. या कर्जांची परतफेड कशी करायची व आपले दैनंदिन जीवन, उपजिवीका कशी चालवायची असा प्रश्न महिलांसमोर उभा आहे. सदर महिलांना मायक्रोफायनान्स कंपनीकडून होत असलेली सक्तीची कर्ज वसुली थांबवून कामगार महिलांना कर्जाची परतफेड करण्यासाठी सवलत मिळण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी संबंधितांची बैठक आयोजित केली होती.  

सदर बैठकीमध्ये लॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांच्या वसुलीवर बंदी घालण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहे.

63
14729 views