राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृति दिनानिमित्त अभिवादन
डॉ. एस. राधाकृष्णन कॉलेज ऑफ एज्युकेशन साकोली येथे विद्यापीठ गीतातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन दि.11/10/2025 रोजी सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अक्षय पुस्तोडे सर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य खेमराज राऊत सर ता. नि. अ. वि. साकोली, प्रा गेंदलाल इंदुलकर सर, प्रा. चेतन कापगते सर, श्री. विनोद भोवते सर, श्री सचिन खोब्रागडे सर, तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यांत आली. यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक स्वरात विद्यापीठ गीत सादर केले. या गीतातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सामाजिक आध्यात्मिक आणि मानवतेचे संदेश भावपूर्ण स्वरूपात मांडले गेले. कार्यक्रमात उपस्थित सर्व प्राध्यापकांनी तुकडोजी महाराज यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणादायी माहिती आपल्या भाषणांमधून दिली. याप्रसंगी कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती सोनवणे तसेच आभार प्रदर्शन साक्षी मेंढे या छात्र अध्यापिकांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकेतर कर्मचारी व बीएड प्रथम वर्ष तसेच बीएड द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.