logo

नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अडावद. ता. चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 10/10/2025 शुक्रवार रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, अडावद यांच्या माध्यमातून राष्ट्रीय सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर जे पवार सर, उप मुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर, पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. श्री पवन सुशीर , आरोग्य निरीक्षक श्री वाय आर पाटील , कैलास बडगुजर आरोग्य सेवक, चांदसणी,लॅब टेक्निशियन सचिन माळी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. सुरुवातीला विद्यालाचे पर्यवेक्षक श्री के आर कनखरे सर यांनी मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये आरोग्य ही सुद्धा आपली मूलभूत गरज असून प्रत्येक व्यक्तीने आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी जागृत राहणे ही प्रत्येकाची गरज व जबाबदारी आहे आणि त्यासाठी वेळोवेळी विविध वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे आहे असे सांगत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर विद्यालयाच्या वतीने आलेले डॉक्टर व आरोग्य सेवकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ श्री पवन सुशीर यांनी मानवी शरीर रचना व क्रिया यांविषयी माहिती देत सिकलसेल नावाचा आजार अनुवांशिक असून रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे उत्पन्न होणारी लक्षणे व त्यावरील उपाय सांगून सिकलसेल आजाराची इथंबूत माहिती विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना देखील दिली. उपस्थित विद्यार्थ्यापैकी 100 मुलींची सिकल सेल रक्त तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे 'यंग इंडिया, फिट इंडिया' या कार्यक्रम अंतर्गत सुपोषित जळगाव या मोहिमे विषयी आहार,पोषण आणि आरोग्याविषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमाला श्री के एस सावकारे, श्री एम एम पाटील, श्री के बी पाटील , श्री एस जी निकम,एस डी पाटील , कार्यक्रमाचे श्रीमती कीर्ती
पाटील मॅडम व आभार प्रदर्शन श्री एस एम साळुंखे यांनी केले.

102
2965 views