logo

दीड वर्षाच्या ऋतुजा चे जीव वाचवण्यात देवा ग्रुप ची आर्थिक मदत

अहमदनगर.
अकोले.

तालुका अकोले धामणगाव गावातील केवळ दीड वर्षांची कु. ऋतुजा शिंगवे हिला निमोनियाचा गंभीर त्रास झाला असता, तिच्या जीवासाठी देवा ग्रुपने तात्काळ पुढाकार घेत मदतीचा हात दिला. अकोले येथील डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याने संगमनेरला हलवण्याचा सल्ला दिला.

छत्रपती संभाजीनगर देवा ग्रुप जिल्हाध्यक्ष श्री.सतीश कुबडे यांनी संगमनेर शहर अध्यक्ष मुस्तफा मोमीन व उपाध्यक्ष अमोल ढोले यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती कळवली. तात्काळ कृती करत ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी ऋतुजा ला संगमनेर येथील डॉ. खताळ हॉस्पिटल येथे दाखल केले. डॉक्टरांनी प्रकृती अधिक बिघडल्या चे सांगत तिला लोणी प्रवरा हॉस्पिटल, येथे दाखल करण्याचा सल्ला दिला.

क्षणाचा विलंब न करता देवा ग्रुपने प्रवरा हॉस्पिटल शी संपर्क साधून बेड ची व्यवस्था केली व तातडीने ऍम्ब्युलन्स ची सोय करून ऋतुजा ला सुरक्षितपणे लोणी येथे हलवण्यात आले. वेळवर तिच्यावर उपाय सुरु कारणात आला.

देवा ग्रुप फाउंडेशन संगमनेर चे अध्यक्ष मुस्तफा मोमीन, उपाध्यक्ष अमोल ढोले, सचिव आरिफ सय्यद, कार्याध्यक्ष विकी गवळी, मीडिया प्रभारी सानू बेगमपुरे तसेच पदाधिकारी विशाल सोनवणे, माजिद शेख, मोईन शेख, रेहान मोमीन, स्वप्नील गोसावी, साम शिंदे, अक्षय मोरे, रोमांस सय्यद, आवेश बागवान, आली जागीरदार, सरताज मोमीन यांच्या प्रयत्नांमुळे ही मदत शक्य झाली.

देवा ग्रुपचे सामाजिक कार्य परत एकदा जनतेच्या मनात आदराचे वर्चस्व दिसून येत आहे.

39
2905 views