भिगवण पोलिस स्टेशनची कामगिरी अट्टल चोरी घरफोड्या करणाऱ्या छोटुला केले मोठ्या शिताफीने अटक, सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम हस्तगत.
भिगवण पोलिस स्टेशनची कामगिरी अट्टल चोरी घरफोड्या करणाऱ्या छोटुला केले मोठ्या शिताफीने अटक, सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम हस्तगत.
मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण प्रतिनिधी : दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास मौजे भिगवण गावचे हद्दीत वार्ड नंबर . ४ येथुन पांडुरंग नामदेव जानराव , वय ४० वर्ष , व्यवसाय . हॉटेल , रा . भिगवण वार्ड नंबर .४ , ता . इंदापुर , जि . पुणे यांचे राहते घरातुन अज्ञात चोरट्याने त्याच्या राहत्या घराच्या टेरेस वरून खिडकीची जाळी तोडुन, दरवाजा उघडुन त्यावाटे घरामध्ये प्रवेश केला व फिर्यादी यांचे वडीलांना एका रूममध्ये कोंडुन ठेवुन, फिर्यादी यांच्या दुसऱ्या खोलीतील लोखंडी कपाटाचा दरवाज्या तोडुन कपाटामध्ये ठेवलेले सोन्या , चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण ५,४४,३३२ / – रू किंमतीचा माल चोरी केला, या चोरीची दखल घेत भिगवण पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरटयाचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भिगवण पोलीस स्टेशनचे हददीत दिवसाचे वेळी घरफोडी चोरी झाल्यामुळे नागरीकांचे मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते . त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणणे पोलीसांसाठी एक अव्हान निर्माण झाले होते. सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री . विनोद महांगडे , सहा.पोलीस निरीक्षक यांनी तपास पथक तयार करून सदर गुन्हयातील अज्ञात चोरटा याचा शोध घेणे कामी तपास पथक रवाना केल्या. तपास पथकामधील संतोष मखरे , पो . कॉ. व योगेश कुलकर्णी , पो.कॉ.ब. यांनी अत्यंत कसोटीने व बारकाईने भिगवण परीसरामध्ये सुमारे ५० पेक्षा जास्त सी . सी . टी . व्ही . फुटेज ची पाहणी करून त्यामधुन एक संशईत इसमाचा शोध घेतला . सदर इसमाचा फोटो महाराष्ट्र क्राईम पोलीस ग्रुपवर प्रसारीत केले असता सदरचा इसम हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले दिवसा व रात्रीच्या वेळी घरफोडी चोरी करणारा आरोपी असुन त्याचे नाव छोटु उर्फ अस्लम उर्फ राजु कुंडलीक म्हेत्रे , रा. शिवाजीनगर निलंगा , ता.निलंगा , जि . लातुर असे असल्याचे समजले. आरोपी हा घराचे बाथरूमचे पाईप वरून घराचे वर चढुन चोऱ्या करतो परंतु तो जवळ कधीही मोबाईल वापरत नाही व तो नियमीत त्यांचे राहते ठिकाण बदलत असतो अशी माहीती मिळली. त्यामुळे त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेणे पोलासांचे समोर एक नविनच अव्हाण निर्माण झाले .
भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री . विनोद महांगडे , सहा . पोलीस निरीक्षक यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन अमित पाटील , पोलीस उपनिरीक्षक , पोलीस अंमलदार महेश उगले , सचिन पवार , संतोष मखरे , योगेश कुलकर्णी यांची तपास टिम तयार करून आरोपीचा लातुर व कर्जत , जि . रायगड या ठिकाणी शोध घेणे कामी रवाना केले . आरोपीचा शोध घेत असताना आरोपी पुढे पोलीस पाठीमागे असा खेळ सुरू झाला . आरोपी हा अटट्ल गुन्हे असल्यामुळे मिळुन येत नव्हता . पोलीस पथकातील आधिकारी व अंमलदार यांनी सुमारे ५ दिवस कर्जत , जि . रायगड व लातुर या ठिकाणी त्याचे पाळतीवर राहुन अत्यंत कसोटीने सी . सी . टी . व्ही . फुटेज व तांत्रिक विश्लेषनाचे व गोपनिय बातमीदार यांचे मदतीने याचा त्याच नाव छोटु उर्फ अस्लम उर्फ राजु कुंडलीक म्हेत्रे, रा. शिवाजीनगर नलगा , ता. निलंगा , जि. लातुर असे असल्याचे समजले . आरोपी हा घराचे बाथरूमचे पाईप वरून घराचे वर चढुन चोऱ्या करतो परंतु तो जवळ कधीही मोबाईल वापरत नाही व तो नियमीत त्यांचे राहते ठिकाण बदल अशी माहीती मिळाली . त्यामुळे त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेणे पोलासांचे समोर एक नविनच अव्हाण निर्माण झाले .
भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री . विनोद महांगडे , सहा . पोलीस निरीक्षक यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन अमित पाटील , पोलीस उपनिरीक्षक , पोलीस अंमलदार महेश उगले , सचिन पवार , संतोष मखरे , योगेश कुलकर्णी यांची तपास टिम तयार करून आरोपीचा लातुर व कर्जत , जि . रायगड या ठिकाणी शोध घेणेकामी रवाना केले . आरोपी हा अटट्ल गुन्हे असल्यामुळे मिळून येत नव्हता. तपास पथकातील अंमलदार महेश उगले व संतोष मखरे यांनी आरोपीचे घराचे परीसरात सापळा लावुन आरोपीस यास दिनांक ०१ ऑक्टोंबर रोजी कर्जत जि . रायगड येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली . त्यामुळे आरोपीस अटक करण्यात आली आहे . अटक आरोपीस यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला ३,१३,६ ९ २ / – रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे . त्याची दिनांक . ०८ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास अमित पाटील , पोलीस उपनिरीक्षक , भिगवण पोलीस स्टेशन हे करीत आहेत .
सदरची कामगिरी मा . संदीप सिंह गिल्ल साो , पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण , मा . गणेश बिरादार सो , अपर पोलीस अधीक्षक , बारामती विभाग , पुणे ग्रामीण , मा . डॉ सुदर्शन राठोड सो , उपविभागीय पोलीस अधीकारी , बारामती विभाग , मा . अविनाश शिळीमकर साो , वरीष्ठ पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली विनोद महांगडे , सहा . पोलीस निरीक्षक , भिगवण पो.स्टेचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील , पोलीस अंमलदार सचिन पवार , महेश उगले , संतोष मखरे , योगेश कुलकर्णी , तुषार रायकर , संकेत जाधव , चेतन पाटील दिपाली मोरे यांनी केली आहे .