logo

इंडियन कॉपी राईट प्रोटेक्शन व सह कर्म सामाजिक फाउंडेशन कल्याण तर्फे कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन च्या 135 महिला पदाधिकारी यांचा सन्मान

*इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन व सहकर्म सामाजिक फाउंडेशन कल्याण तर्फे कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या पदाधिकारी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित*💐💐
दिनांक ५/१०/२०२५ रविवारी रोजी इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन व सहकर्म सामाजिक फाउंडेशन कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने, कल्याण येथे महाराष्ट्र गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३५ बंधू भगिनींना सन्मानित करण्यात आले.यावेळी इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शनचे संस्थापक सन्मा.श्री.रामजीत गुप्ता व मेजर गवई,हिंदु धर्म रक्षक, शर्मा, मराठी अभिनेत्री साक्षी नाईक, शालिनी पाटील, यांच्या हस्ते कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन टीमच्या पदाधिकारी, ज्योतीताई ठाकरे, वैशाली सोनवणे, मनिषाताई पांडे, मिनाक्षी सोनवणे, स्वाती सोनवणे ह्या पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले, ह्या वेळी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने ह्या सोहळ्याचे आयोजक आय.सी.पी सन्मा.श्री.रामजीत गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला,व केपीएम च्या माध्यमातून होत असलेल्या कार्याची माहिती दिली.

1
291 views