logo

पोलीस आरोग्य सेवेचा उपक्रम : युवासेनेतर्फे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आरोग्य शिबिरे

पोलीस आरोग्य सेवेचा उपक्रम : युवासेनेतर्फे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आरोग्य शिबिरे

चिखली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्याशी सकारात्मक चर्चा

पुणे: प्रतिनिधी : उमेश पाटील 8530664576
---
महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे, मावळचे विशेष महासंसदरत्न खासदार श्री श्रीरंग अप्पा बारणे, तसेच युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव कु. विश्वजितजी बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना व युवा सेना जिल्हाप्रमुख श्री सागर दत्तात्रय पाचर्णे यांच्या तर्फे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या नियोजनासाठी आज चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल साळुंखे यांची भेट घेण्यात आली. या भेटीत शिबिराच्या कार्ययोजनेवर सकारात्मक चर्चा झाली. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपक्रमांची माहिती देण्यात आली.
युवासेनेच्या या पुढाकारामुळे समाजासाठी अखंड झटणाऱ्या पोलिसांच्या आरोग्य रक्षणास मोठी चालना मिळणार असून, या शिबिरांत रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार तपासणी, नेत्र तपासणी, तसेच आवश्यक औषधोपचार यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आपलाच,
श्री सागर दत्तात्रय पाचर्णे
युवासेना जिल्हाप्रमुख व
शिवसेना वैद्यकीय कक्ष मावळ लोकसभाप्रमुख

0
0 views