logo

अलिबागमध्ये बच्चू कडूंची हक्क यात्रा

रायगड प्रतिनिधी,:-
प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे हक्क यात्रेच्या निमित्ताने येत्या 9 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असून तसे नियोजन करण्यात आली असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सचिन साळुंके यांनी माणगाव येथे रविवारी (दि.5) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना सचिन साळुंके यांनी सांगितले की, प्रहार संघटना मेंढपाल, शेतकरी, मच्छीमार, दिव्यांग यांच्या सामाजिक प्रश्नासंदर्भात काम करीत आहे. संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी या सर्व प्रश्नांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हक्क यात्रा काढली असून या हक्क यात्रेला सर्व जिल्ह्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे. आता ही हक्क यात्रा रायगडात येत आहे. बच्चू कडू 9 ऑक्टोबरला अलिबागला येत असून संघटनेतर्फे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात येणार आहे. यावेळी अलिबाग येथे बच्चू कडू यांच्या हस्ते संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचेही साळुंके यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रहार दिव्यांग संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुनील घनमोडे, रोहा तालुकाध्यक्ष महेबुब अत्तार, माणगाव – तळा तालुकाध्यक्ष नरेश साळवी, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग डांगरेकर, महाड-पोलादपूर तालुकाध्यक्ष फैज हुर्जक आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

0
342 views