बोगस दिव्यांग प्रमाण पत्र धारक अधिकारी यांच्यावर कारवाई करणार भजनदास पवार
गेल्या वर्षी जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये दिव्यांग कल्याण विभागातर्फे जवळपास 359 लोकांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस असून त्यांची फेर वैद्यकीय तपासणी करण्याची निर्देश आमदार बच्चू कडू यांनी त्यावेळेस दिलेले होते. परंतु अद्याप त्यावर काय कार्यवाही करण्यात आली याबाबत मंत्रालय स्तरावरील अधिकारी टाळाटाळ करत आहेत. अनेक वेळा संपर्क करूनही काहीच उत्तरे देत आहेत .याबाबत दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव माननीय तुकाराम मुंढे यांच्याकडे ईमेल द्वारे तक्रार केलेली आहे .याबाबत त्यांनी काय केले याची माहिती मिळू शकलेली नाही. तरी त्यांनी लवकरात लवकर याविषयी येऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कामगार संघर्ष संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भजनदास पवार यांनी इ मेल द्वारे दिला आहे