logo

• ग्रामरोजगार सहाय्यकांचे मानधनसाठी आमरण उपोषण • श्री. श्रावण बोकडे यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस.

• ग्रामरोजगार सहाय्यकांचे मानधनसाठी आमरण उपोषण •
" महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांचे मनरेगा चे काम बंद करून मानधनासाठी आमरण उपोषणाचा सहावा दिवस "
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 अंतर्गत देशातील प्रत्येक गावात गरजु नागरीकांना कामे पुरविण्यासाठी ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या रोजगार सहाय्यकांना पुर्ण वेळ काम करूनही शासन स्तरावर अर्धवेळ म्हणुन गणल्या जात आहे . रोजगार सहाय्यकांना मानधन वितरीत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक 03 आक्टोंबर 2024 रोजी शासन निर्णय काढला परंतु मागील एक वर्षापासुन शासन निर्णयानुसार एक रुपयाही मानधन रोजगार सहाय्यक यांना वितरीत करण्यात आलेले नाही . संपुर्ण महाराष्ट्रराज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांना एक वर्षापासुन शासन निर्णयानुसार एक रुपया ही मानधन देण्यात आलेले नाही तर रोजगार सहाय्यक त्यांचे कुटुंबाची उपजिवीका कसे काय भागवित असतील याचा विचार करण्यासाठी , नियम बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकार मध्ये कोणतीच यंत्रणा नाही काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे . महाराष्ट्र राज्यातील सरकारी अधिकारी , कर्मचारी, मुख्यमंत्री , आमदार , यांचे मानधन पगार कधी वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवतात का मग देशात सर्वसामान्यांपर्यंत रोजगार , कामे उपलब्ध करून देणारा कायदा योजना सुरळीतपणे ग्रामस्तरावर सुरू ठेवण्यासाठी कामे करणारे ग्राम रोजगार सहाय्यकांनाच मानधन न देता उपाशीपोटी काम करावे लागत आहे त्या कारणास्तव महाराष्ट्रराज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे श्री. श्रावण बोकडे जी महाराष्ट्रराज्यातील संपुर्ण ग्रामरोजगार सहाय्यकांच्या वतीने त्यांच्या व्यथा मागण्या शासनाला निवेदन देऊन मा.जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे दिनांक 03 आक्टोंबर 2025 रोजीपासुन आमरण उपोषणास बसलेले आहेत राज्यातील संपुर्ण ग्रामरोजगार सहाय्यक त्यामध्ये सहभागी आहेत , आज आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे परंतु महाराष्ट्रराज्य शासनाच्या कोणत्याच सक्षम अधिकारी तसेच मंत्रिमंडळातील कोणत्याच पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही . राज्यात लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या मागण्या रास्त आहेत.
मागण्या - 1) दिनांक 03 आक्टोंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सहाय्यक यांना मानधनाचे वितरण वैयक्तिक खात्यात देय करण्यात यावे . 2) ग्रामरोजगार सहाय्यकांना पुर्णवेळ दर्जा देण्यात यावा. 3) ग्रामरोजगार सहाय्यकांना नियुक्त करण्याचे व सेवा समाप्ती करण्याचे अधिकार जिल्हाप्रशासनाला देण्यात यावेत . 4) दुर्गम भागातील ग्रामरोजगार सहाय्यकांना विषेश दर्जा देण्यात यावा .
आमरण उपोषणाचे निवेदन शासन स्तरावर मा.जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती ; मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रराज्य ; मा.मुख्य सचिव महाराष्ट्रराज्य ; मा.अवर सचिव रोहयो महाराष्ट्रराज्य ; मा.रोहयो मंत्री महाराष्ट्रराज्य ; मा. मनरेगा आयुक्त नागपुर ; मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्रराज्य ; मा.पोलीस आयुक्त अमरावती ; मा. विभागीय आयुक्त अमरावती यांना दिलेले आहेत .
महाराष्ट्रराज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अमलात आले पासुन आजदिनांकपर्यंत हजेरी मस्टर तालुका स्तरापर्यंत पोहचविणे करीता टिए डिए अल्पोपहारखर्च देण्यातच आलेला नाही सहा टक्के प्रशासकीय खर्चाची रक्कम कोठे खर्च करण्यात येते याबाबत गंभीर परिस्थिती आहे केंद्र सरकारकडून संबंधित बाबीची योग्य चौकशी सुद्धा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे .

330
11121 views