
वाल्हेकरवाडीत नवरात्र महोत्सव उत्साहात संपन्
११ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक वितरण – नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
वाल्हेकरवाडीत नवरात्र महोत्सव उत्साहात संपन्
११ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक वितरण – नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
वाल्हेकरवाडी (पिंपरी चिंचवड) : उमेश पाटील: 8530664576
वाल्हेकरवाडीत दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हा भव्य महोत्सव आणि रास- दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांना तीन ई-बाईक, तसेच उत्तेजनार्थ साडी, गिफ्ट बॉक्स आणि लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. श्रीमती जयश्री राजेंद्र खैरे व समस्त ग्रामस्थांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आयोजक मा. भरत वाल्हेकर आणि सुप्रिया भरत वाल्हेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी भरत वाल्हेकर यांचा सत्कार करण्याची मागणी केली असता त्यांनी नम्रपणे सांगितले, “निवडणुकीनंतर माझा सत्कार करा, मी सदैव तुमच्या सेवेसाठी हजर आहे.” त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा गजर केला.
गेल्या १२ दिवसांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमात महिलांचा, तरुणांचा आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. भरत व सुप्रिया वाल्हेकर यांनी प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांसाठी भव्य व्यासपीठ निर्माण करून हा सांस्कृतिक सोहळा अविस्मरणीय बनविला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीना गुलाब वाल्हेकर, वैशाली सुनील वाल्हेकर, आकाश राजेंद्र खैरे, शुभम सुनील वाल्हेकर, यश गुलाब वाल्हेकर, चंद्रकांत दत्तोबा चिंचवडे, गुलाब शंकर वाल्हेकर, प्रजाक्ता हेमंत वाल्हेकर यांच्यासह ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले.
एकूणच, वाल्हेकरवाडीतील नवरात्र महोत्सव हा केवळ सांस्कृतिक उत्सव न राहता ग्रामएकतेचा, परंपरेचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा प्रतीक ठरला. महिलांनीही या कार्यक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत भरत व सुप्रिया वाल्हेकर यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
भरत वाल्हेकर यांनी सांगितले की, “नवरात्र महोत्सवाप्रमाणेच पुढेही विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून प्रभाग क्रमांक १७ एकसंघ ठेवू.”
गेल्या बारा दिवसांत या महोत्सवाची चर्चा केवळ वाल्हेकरवाडीत नव्हे तर आसपासच्या प्रभागांतही रंगली होती. नागरिक, महिला आणि युवकांनी जणू एक कुटुंब म्हणून सहभाग घेतल्याने हा उत्सव सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.