logo

“विदर्भ भोई समाज वधू-वर परिचय मेळावा” संदर्भात प्रलंबित व्यवहार व स्पष्टीकरणाची मागणी


वर्धा जिल्हा प्रतिनिधी:-

विदर्भ भोई समाज सेवा संघतर्फे आयोजित “विदर्भ भोई समाज वधू-वर परिचय मेळावा” या कार्यक्रमासंदर्भात प्रलंबित व्यवहाराबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत रविंद्र पारीसे यांनी संघाचे अध्यक्ष उकंड सोनोने यांना निवेदन सादर केले आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की, संघाचे महासचिव मनोहर पचारे यांनी मेळाव्याच्या आयोजनाच्या नावाखाली ₹२५,९००/- रक्कम स्वीकारली होती. तसेच मेळाव्याच्या प्रसंगी चिवडा, राजगिरा लाडू २४ पाकीट, बालुशाही, प्लेट, चमचे आदी साहित्याचे ₹३,३००/- खर्च श्री. पारीसे यांनी स्वतःच्या खर्चाने केल्याचे नमूद आहे. परंतु या दोन्ही रकमा आजपर्यंत अदा झालेल्या नाहीत.
या प्रमाणे एकूण ₹२९,२००/- (अक्षरी – एकोणतीस हजार दोनशे रुपये) इतकी रक्कम प्रलंबित असल्याचे पारीसे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी सांगितले की, या व्यवहाराचा व्यक्तिगत स्वरूपाशी संबंध नसून तो विदर्भ भोई समाज सेवा संघाच्या माध्यमातून झालेला आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या वधू-वर परिचय मेळाव्यानंतर २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वार्षिक मासिकात त्यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, तसेच मासिकाचे प्रतीही उपलब्ध करून देण्यात आले नाहीत.
सदर विषयावर पारीसे यांनी अध्यक्ष उकंडराव सोनोने यांच्याकडे निवेदनाद्वारे स्पष्टीकरण व प्रलंबित रकमेच्या तात्काळ परतफेडीची मागणी केली आहे.

70
2242 views