अजमेरा कन्स्ट्रक्शन कंपनीमुळे ग्रामपंचायत पाणीपुरवठा रस्ता व शेतरस्त्याचे नुकसान झाले आहे या बाबत......
📰 स्थानिक बातमीमेंढा परिसरात अजमेरा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरु असलेल्या कामामुळे ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा रस्ता तसेच शेतरस्त्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. रस्त्यावर मुरूम वाहून नेहला असून खडे व माती रस्त्यावर पडल्याने शेतकऱ्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे कठीण झाले असून काही ठिकाणी रस्ता खचल्याचीही तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायतीने व मसूल खात्याने या संदर्भात कंपनीकडून झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून तातडीने दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.