logo

“शब्दवेल” या कवितासंग्रहाची शासनमान्य ग्रंथाच्या यादीसाठी शिफारस

नांदेड येथील ज्येष्ठ कवी दि.मा. देशमुख यांच्या श्रीकर प्रकाशन निर्मित "शब्दवेल" या कवितासंग्रहाची महाराष्ट्र शासन ग्रंथ निवड समितीने शासनमान्य ग्रंथांच्या यादीसाठी शिफारस केली आहे. विशेष म्हणजे दि मा देशमुख यांच्या प्रकाशित ९ कवितासंग्रहापैकी ८ संग्रह श्रीकर प्रकाशन तर्फे निर्माण झाले आहेत.
दि मा देशमुख सलगरकर यांनी धर्म अर्थ काम मोक्ष अध्यात्म संस्कृती राजकारण निसर्ग देव देश आणि धर्म वातावरण कुटुंब संस्कार समाज बालविश्व महिला युवक विद्यार्थी अशा विषयांवर सातत्यपूर्ण काव्यलेखन केले आहे. त्यांच्या रचना मानवी मनाला भुरळ घालणाऱ्या आहेत. नव समाज निर्मितीसाठी त्यांच्या कवितांचे योगदान खुप मोलाचे आहे, त्यांच्या कविता मनातले भाव मांडतात आणि त्या प्रत्येकाला आपल्याशा वाटतात अशा भावना ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक मार्तंड कुलकर्णी, बाल साहित्यिक श्री सुरेश सावंत, ज्येष्ठ साहित्यिक आशा पैठणे आदींनी वेळोवेळी मांडल्या आहेत.
महाराष्ट्र शासन ग्रंथ निवड समितीने शासन मान्य ग्रंथांच्या यादीसाठी शब्दवेल या कवितासंग्रहाची निवड केल्याबद्दल कवी दि मा देशमुख सलगरकर यांचे संस्कार भारती परिवार, सर्व साहित्यिक परिवार, ज्येष्ठ गायक संजय जोशी, सुरमणी धनंजय जोशी, ज्येष्ठ तबलावादक प्राध्यापक जगदीश देशमुख, श्री प्रमोद देशपांडे, श्री जयंत वाकोडकर , ज्येष्ठ पत्रकार संतोष कुलकर्णी, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त अनुदानित आश्रम शाळा सिरली चे अध्यक्ष भगवानराव देशमुख,ज्येष्ठ कवी मनोज बोरगावकर, कामगार संघ नेते प्रमोद देशमुख, डॉ अरविंद देशमुख, डॉ जीवन पिंपळवाडकर दिलीप वैद्य, उपेंद्र जोशी, प्रा. विलास वैद्य, ज्येष्ठ संपादक धोंडोपंत विष्णुपुरीकर, प्रजावाणी संपादक शंतनु डोईफोडे, मराठवाडा संपादक, शेवडीकर बंधु., गोविंद पुराणिक, श्रीकर प्रकाशन चे गिरीश कहाळेकर तसेच मित्र परिवार , कुटुंबीय यांचेकडून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

35
4286 views