logo

काटोल तालुक्यातील वडविहरा (पारडसिंगा ) येथे बौद्ध विहारात बुद्ध मूर्तीची स्थापना.....!

नागपुर ग्रामीण:काटोल प्रतिनिधी - न्यूज
वडविहरा (पारडसिंगा ) येथे सम्राट अशोक बौद्ध विहारात गायक सिद्धार्थ सहारे काटोल व गायक विकास राजा त्यांच्या बुद्ध-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम घेण्यात आला. गावातून भव्य पंचशील धम्म रॅली काढण्यात आली. विहारातील बुद्ध मूर्तीचे अनावरण आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी किशोर गाढवे, दिनेश ठाकरे, संदीप सरोदे, दिलीप तिजारे, मदनकर गुरुजी, गिरीश वरोकर, नीलकंठ तिजारे, प्रा. देविदास कठाणे व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी नागपूर येथील भंतेजी च्या प्रमुख उपस्थितीत धम्म प्रवचन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित-रवी दलाल, सा. कार्यकर्ते निळकंठ गजभिये, दिगंबर डोंगरे (माजी नगरसेवक),पांडे सर, ताणबाजी शिंगारे, विकास जी सोमकुवर,आर्या सोमकुवर, दिलीप गायकवाड, भालचंद्र सोमकुवर, सिद्धार्थ सोमकुवर, अक्षय सोमकुवर, प्रा.रवी सोमकुवर, विशाल सोमकुवर, अमित सोमकुवर, विलास रामटेके,विजय गजभिये, रामकृष्ण सोमकुवर, सुनीता सोमकुवर, कांचन सोमकुवर, नीलिमा गायकवाड, साधना सोमकुवर, अनिता सोमकुवर आणि इतर जेष्ठ मान्यवर गावातील युवा मंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवटी गावातील सर्व उपासक आणि उपासिका व मान्यवर यांना भोजनदान देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बंडू गजबे (युथ फाऊंडेशन काटोल), दिपक ढोके (दिशा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर) ह्यांनी सहकार्य केले.

83
1656 views