logo

सातारा जिल्ह्यात मेंढपाळ आर्मी सक्रिय. सर्व मेंढपाळ बांधवानी एकत्र जोडण्याचे आवाहन.

📍गट्टेवाडी, ता. माण, जि. सातारा.
मेंढपाळ आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नवनाथ हणमंतराव गारळे साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. अंकुश भाऊ मुढे साहेब यांच्या आदेशानुसार, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत हुलगे सर आणि सातारा जिल्हाध्यक्ष मा. रमेश भाऊ तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली "मेंढपाळ जोडो अभियान" माण तालुक्यात राबविण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत माण तालुकाध्यक्ष मा. हणुमंत भाऊ ढवाण साहेब व सरचिटणीस मा. रणजित भाऊ जानकर साहेब,यांच्या नेतृत्वाखाली अक्षय जानकर तसेच गट्टेवाडी ता.माण येथील सर्व मेंढपाळ बांधव सक्रिय सहभाग घेत आहेत.

या भेटीत मेंढपाळ बांधवांच्या विविध समस्या व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच हे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी संघटनेमार्फत सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे यावेळी सांगण्यात आले.
मेंढपाळ आर्मी संघटनेमार्फत मेंढपाळ जोडो अभियानात माण तालुक्यातील सर्व गावामध्ये बैठक घेऊन तेथील मेंढपाळांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक निर्णय घेण्याचे काम सुरू आहे.

14
708 views