*♦️ब्रेकिंग..देवरी तालुक्याच्या पुराडा ग्रामंपचायत हद्दीतील मामा तलावात तिन युवकांचे आढळले शव*
*♦️घात की अपघात तपास सुरू...*
पुराडा ग्रामंपचायत हद्दीतील तलावात आढळले तिन युवकांचे शव
♦️घात की अपघात तपास सुरू…तालुक्यात चर्चांना उधाण
देवरी : देवरी तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायत हद्दीतील एका तलावात ३ युवकांचं शव आढळून आल्याने खळबळ उडाली असून तिन्ही युवक पुराडा येथील आहेत.
प्राप्त माहितीनुसार मृत युवकांचे नाव
आदित्य बैस _ गडेवार टोला
अभिषेक आचले_ पुराडा
तुषार राऊत _गडेवार टोला
असे सांगण्यात येत आहे. सदर घटनेचा तपास सुरू असून घटनेमागील कारण सध्या निरुत्तरित आहे.