अतिवृष्टीचा आणखी एक बळी.. धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या
**हिवरा, ता. भूम, जि. धाराशिव :**अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतीचे झालेले प्रचंड नुकसान, वाढता कर्जाचा बोजा आणि आर्थिक अडचणी यामुळे बंडू वासुदेव जगदाळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे जगदाळे यांच्या शेतातील **पिकाचे पूर्णपणे नुकसान** झाले होते. कर्जाच्या वाढत्या ताणामुळे आणि पुढील हंगामाबाबतच्या अनिश्चिततेमुळे त्यांनी मानसिक तणावाखाली हा टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या शेतात जाऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच **भूम पोलिस ठाण्याचे कर्मचारी** घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे हिवरा परिसरात शोककळा पसरली असून,“🌾 **शेतकरी राजा पुन्हा एकदा निसर्ग आणि बेदरकार प्रशासनाचा बळी ठरला...**” अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.