logo

होमगार्डना न्याय नको, हक्क हवा!” — अमळनेरमध्ये मा.आमदार बच्चू कडू यांना संतप्त निवेदन

“होमगार्डना न्याय नको, हक्क हवा!” — अमळनेरमध्ये मा.आमदार बच्चू कडू यांना संतप्त निवेदन

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर येथे होमगार्ड सैनिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले. होमगार्ड सैनिकांना ३६५ दिवस नियमित काम, राज्य शासन कर्मचारी दर्जा, तसेच समान काम समान वेतन लागू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली.
निष्काम सेवा हे ब्रीदवाक्य बदलून होमगार्ड अधिनियम १९४७ मध्ये सुधारणा करून नवीन शासन निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली. सलग पाच वर्ष सेवा बजावणाऱ्या होमगार्डना पोलीस शिपाई किंवा अमलदार पदावर थेट नियुक्ती देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा ₹१५,००० पेन्शन, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षांपर्यंत वाढवावे, आणि राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा, विमा व सवलती देण्यात याव्यात, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देतांना दत्तात्रय पाटील, राकेश चौधरी, अश्फाक शेख, रवींद्र महाले, रामकृष्ण चौधरी, भूषण शिंदे, वैष्णवी पाटील, गणेश लांडगे, जितेंद्र पवार, जितेंद्र महाजन आणि इतर होमगार्ड बांधव उपस्थित होते.

5
292 views