logo

मेलघाटातील आदिवासी बांधवांना रोजगारा अभावी स्थलांतर......... शासन झोपेत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.....?

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा धारणी या मेलघाट परिसरातील आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधींचा अभाव मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शेतीवर आधारित मर्यादित उत्पन्न, पावसाचे अनिश्चित वातावरण आणि औद्योगिक विकासाचा अभाव यामुळे स्थानिकांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.

याच कारणास्तव मोठ्या संख्येने आदिवासी कुटुंबे आपल्या गावातून स्थलांतर करून शहरांकडे आणि इतर जिल्ह्यांत मजुरीसाठी जात आहेत. काही कुटुंबे विटभट्टी, बांधकाम, शेतमजुरी अशा हंगामी कामांसाठी दूरवर निघतात. यामुळे शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो, तर महिलांना आणि वृद्धांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. तसेच शासन हे मेलघाट च्या नाव काही काळात राहणारच नाही असे माजुराना वाटते.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सांगतात की, जर मेलघाट परिसरातच आदिवासींसाठी रोजगारनिर्मिती प्रकल्प, वनउत्पादनावर आधारित उद्योग आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवले गेले, तर स्थलांतराची वेळ या बांधवांवर येणार नाही. शासनाकडून या संदर्भात ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक पातळीवर होत आहे.

4
242 views