logo

*_गडचिरोलीत सेवा पंधरवडा अंतर्गत भव्य नेत्र तपासणी आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न_* ----------------------------------------

गडचिरोली :-1ऑक्टोबर *_गडचिरोलीत सेवा पंधरवडा अंतर्गत भव्य नेत्र तपासणी आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न_*
----------------------------------------
*_मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन_*

गडचिरोली (दि. १ ऑक्टोबर २०२५):
पंतप्रधान मान. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या “सेवा सुशासन, गरीब कल्याण – सेवा पंधरवडा” या उपक्रमाअंतर्गत गडचिरोली शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य नेत्र तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य दक्ष कार्यालयात पार पडले.

या नेत्र शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

उद्घाटनानंतर मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी आपल्या नेत्राची तपासणी करत उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले “नेत्र हेच जीवनाचे खरे दालन आहेत. जगण्याचा प्रत्येक क्षण आपण डोळ्यांतून अनुभवतो. डोळ्यांचे आजार सुरुवातीस साधे वाटतात, पण वेळेत उपचार न केल्यास ते गंभीर रूप घेऊ शकतात. मोतीबिंदू, डोळ्यात पाणी येणे, अंधुक दिसणे असे आजार टाळण्यासाठी वेळोवेळी नेत्र तपासणी आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या नेत्रांची योग्य ती काळजी घ्यावी, हीच खरी सेवा आहे.”असे व्यक्तव्य मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांनी नेत्र तपासणी करताना व्यक्त केले.

या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत मोफत नेत्र तपासणी करून घेतली. तज्ज्ञ डॉक्टर्सनी मार्गदर्शन करत नेत्र आजाराविषयी सविस्तर माहिती दिली.

या प्रसंगी गडचिरोलीचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, भाजप नेत्या डॉ. चंदाताई कोडवते, कि.मो. प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, गोविंद सारडा, गीताताई हिंगे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा योगिता पिपरे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुका अध्यक्ष दतु सुत्रपवार, ओबीसी नेते अनिल पोहनकर, माजी तालुका अध्यक्ष आनंदजी भांडेकर, डॉ. मनोहर मडावी, प्रा. सतीश चिचघरे, तसेच अविनाश विश्रोजवार, देवाजी लाटकर, कविता उरकुडे, लता लाटकर, सीमा कन्नमवार, पुष्पा करकाडे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडचिरोली शहरात आयोजित हे नेत्र तपासणी शिबिर म्हणजे सेवा पंधरवड्याला एक अर्थपूर्ण योगदान ठरले. समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी असे उपक्रम सतत व्हावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

11
1037 views