
मनोज पाटील यांचे कार्य कौतुकास्पद : विजयकुमार मिठे*
*वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मिष्ठान, शैक्षणिक साहित्य वाटप*
दिंडोरी । प्रतिनिधी
शब्दांच्या सहवासात राहिले की माणूस सुसंस्कृत आणि नम्र होतो.आपण समाजाचे काही देणे लागतो, ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. वर्तमानपत्रांमध्ये काम करीत असताना मनोज पाटील यांचा मोठा मित्र परिवार आहे आणि आज याच मित्रपरिवाराने मनोज पाटील यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना मिष्ठांन आणि शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण करून साजरा केला. समाजातील सर्वांशी मिळून मिसळून कसे राहावे, वागावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनोज पाटील आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी केले. दिंडोरी येथील श्री ईशान्येश्वर विद्यानिकेतन स्कूल व ज्युपिटर इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मनोज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मिष्ठांन आणि शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी अधयक्षस्थानावरुन विजयकुमार मिठे बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून निळवंडीचे पोलिस पाटील अंबादास पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते कवी राजेंद्र गांगुर्डे, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे, सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरे, निळवंडीचे उपसरपंच शंकर पाटील, रोहिदास पाटील, मेजर विजय पाटील, शांताराम जाधव, हिंदु विश्व रक्षा संघटनेचे तालुकाध्यक्ष मित्रानंद जाधव, उपाध्यक्ष शामराव बोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना केळी, राजगिरीचे लाडू, बिस्किट वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या प्रांगणात फळे, फुले, औषध उपयोगी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते कवी राजेंद्र गांगुर्डे यांनी मनोज पाटील हे व्यक्तीमत्व अतिशय साधारण व्यक्तीमत्व होते. परंतू सर्वांशी मिळून मिसळून वागण्यामुळे त्यांची अपेक्षित अशी जडणघडण झाली आणि आज तालुक्यातील एक सर्वाना हवेहवेसे पत्रकार व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरे यांनी मनोज पाटील यांनी अतिशय मेहनत घेऊन आपले नाव उज्वल केलेले असून आमच्या निळवंडी गावाचे ते वैभव असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे यांनी सांगितले की, वाढदिवसासाठी केक कापण्याऐवजी फळे व मिष्ठांन विद्यार्थ्यांना वाटप करुन साजरा करण्याचा आदर्श समाजाने घ्यावा. मनोज पाटील यांनी अतिशय चांगला उपक्रम राबविला असून इतरांनी त्यांचा आदर्श घेवून सामाजिक उपक्रम राबवावे, असे आवाहन केले. यावेळी प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट नवी मुंबई अध्यक्ष राजेंद्रकुमार सुराणा, समन्वयक दुर्वादास गायकवाड यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे वृक्षप्रेंमी भाऊसाहेब चव्हाणके यांनी वृक्ष उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचेही आभार मान्यवरांनी मानले. याप्रसंगी मान्यवरांनी आपल्यामनागेतात मनोज पाटील यांच्यावर सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमास अभिनेते प्रतीक मिठे, ऋषीकेश खांदवे, तेजस पवार, प्राचार्या अंचल तिवारी, शिक्षिका कल्याणी केदारे, धनश्री गावित, ऋतिका कराटे, स्नेहराज पीठे आदींसह शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन धनश्री गावित यांनी केले तर आभार कल्याणी केदारे यांनी मानले.