logo

लोणी बु. तांडा रहिवाशांचे रस्ता दुरुस्तीचे निवेदन – अवकाळी पूरामुळे मोटरसायकल वाहून गेली

प्रतिनिधी. अनिकेत मेस्त्री

पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील जुना तांडा परिसरात अवकाळी पावसामुळे वड्यावर पूर आला आणि सकाळी नऊ वाजता मोटरसायकलवरून जात असलेले दोघे नागरिक वाहून गेले. तांडा परिसरातील नागरिकांच्या तत्काळ प्रयत्नांमुळे दोघांना वाचवले गेले आणि मोटरसायकल शोधून काढली गेली.

तांडा रहिवाशांनी सांगितले की, 1972 पार जुना रस्ता अस्तित्वात आहे, पण काही शेतकऱ्यांनी तो बंद करून दिल्यामुळे नागरिकांना कॅनलमार्गे जावे लागते, जो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वड्यावर पूर आल्यास नागरिकांचा ये-जा ठप्प होतो.

राहिवाशांनी गट नंबर २८१ मधून जाणारा जुना रस्ता खुला करून, मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे, तसेच वड्यावर मोठा पूल बनविण्याची विनंती केली आहे.

सरपंच मायंदळे ताई, उपसरपंच रामा गवारे, पोलीस पाटील रणजीत नाना गिराम, ग्रामसेवक फंड साहेब व इतर सदस्यांनी ग्रामसभेत ठराव मांडून तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. मंडळ

तांडा रहिवाशांचे म्हणणे आहे की, जर गट 281 मधून जाणारा रस्ता त्वरित उघडला नाही, तर ते लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास तयार आहेत

313
6071 views