logo

"विठ्ठल सहकारी साखर कारखाना व अभिजीत पाटलांच्या कथित खंडणी प्रकरणाबाबत.....


"२३ वर्षाच्या पोराला आमदार अभिजीत पाटील का घाबरले?"

१० जुलै रोजी पंढरपूर येथे घडलेल्या खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेले कामगार नेते ॲड.किर ygणराज घोडके यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर गंभीर खुलासे केले तसेच आमदार अभिजीत पाटील यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.
यावेळी बोलताना किरणराज घोडके यांनी पत्रकारांचे व सभासद शेतकऱ्यांचे आभार मानले व या खंडणी प्रकरणामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे प्रश्न राज्यभर पोहोचले असल्याचा आनंद व्यक्त केला. या घटनेनंतर लोक प्रश्न विचारायला शिकले आहेत. चेअरमन अभिजीत पाटील यांनी केलेल्या ३४७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत आता सर्वांनी प्रश्न विचारायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच आमदार अभिजीत पाटील यांनी मी कामगारांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देत असल्याने व चेअरमन यांचे घोटाळे उघडकीस आणत असल्याने मला खोट्या केसेस मध्ये अडकवून माझा लढा थांबवण्यचा प्रयत्न केला आहे असा दावा केला.माझ्यावर १ कोटींच्या खंडणीच्या आरोपाच्या आडून ३४७ कोटी रुपयांचा दरोडा पचवायचं षडयंत्र सुरू आहे ते होऊ देणार नाही.मुळ प्रश्न बाजूला पाडण्यासाठी नौटंकी केली.तसेच किरण विकला जात नाही हे समजल्यानंतर त्यांनी हे षडयंत्र रचले व मला ठरवून खोट्या केसमध्ये गोवण्यात आले.शेतकऱ्याच्या पोरांना खोट्या केसेस मध्ये अडकवून तुमच्या विरोधात लढणारांना भिती घालून उदाहरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला की अभिजीत पाटलांच्या विरोधात गेलात तर अडकवला जाल पण या घटनेनंतर मी महाराष्ट्रातील तरुणांसमोर उदाहरण निर्माण केले की सामान्य शेतकऱ्याची पोरं जर जिद्दीला पेटली आणि मैदानात उतरले तर आमदार असो नाहीतर मंत्री,वाळूचोर असो नाहीतर गुंड त्यांना गुडघ्यावर आणण्याची ताकद शेतकऱ्याच्या पोरांमध्ये आहे .
अशा कितीही खोट्या केसेस झाल्या तरी मी कामगारांची काळजी आणि त्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या सोबत लढणं सोडू शकत नाही.मी मॅनेज होत नाही याचा जिवंत पुरावा म्हणून या केसकडे मी पाहतोय.कारण विकले गेले ते सत्तेत सहभागी झाले आहेत.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी यशाच्या शिखरापासून बदनामी च्या चिखलापर्यत मी सगळं अनुभवलं आहे.तुम्ही वाळूचोरत होता तेव्हा हा किरण घोडके सभासदांच्या कर्जासाठी भांडत होता.
तुम्ही शेतकऱ्याच्या पोरांना गुन्हेगारी क्षेत्रात ओढत होता तेव्हा हा किरण घोडके शैक्षणिक परिवर्तनासाठी आंदोलन करत होता.
तुम्ही शेतकऱ्यांना गंडवून गावोगावी दहशत माजवत होता तेव्हा हा किरण घोडके शेतकरी समस्येवर पुस्तक लिहित होता. असा टोल टोला सुद्धा लगावला आहे.एका २३ वर्षे वयाच्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराची एवढी भिती का वाटतेय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे

सत्य सांगणं जर बदनामी असेल आणि त्यामुळे मला कारावास भोगावा लागला तर मी ते १००० वेळा करेन असेही त्यांनी सांगितले.
तसेच मुळ प्रश्न बाजूला पाडण्यासाठी नौटंकी केली तरी ते होऊ देणार नाही असा इशारा दिला व पुढी आरोप केले...

१) NCDC कडून मिळालेल्या ३४७ कोटी रुपयांचा हिशोब मिळालाच पाहिजे.
२) कामगारांचे थकित वेतन कधी देणार आहेत?
३) सत्ता मिळाल्यापासून तीन वर्षांतला एकूण नफा कुठे गेला ?
४) विठ्ठल कारखाना कर्जमुक्त करण्याची वल्गना केल्या त्यांच काय?
५) आजअखेर विठ्ठल कारखान्यावर किती रुपयांचे कर्ज आहे?
६)तोडणी वाहतूकदारांच्या पैशाचं काय केलं?
७)बोगस ऊसगाळप किती झाला? त्याचा मुख्य आरोपी कोण?
८)नवीन पोरांना सालगडी बिगारी सारखं राबवलं जाते?
यांच्या नात्यातील लोकांनाच पगारी कशासाठी एवढ्या मोठ्या?
९)सभासदांना दिलेली साखर धाराशिव कारखान्याची का दिली?
दिलेली साखर किती रुपयांनी खरेदी करण्यात आली?

बोगस ऊसगाळप करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप किरण घोडके यांनी केले.तसेच चेअरमन यांचे नातेवाईक संस्थेच्या लाखो रुपये पगारावर डल्ला मारत आहेत आणि अशा अनेक गोष्टीतून अभिजीत पाटील विठ्ठल कारखान्याची राखरांगोळी करत आहेत म्हणून आता आणखी ताकदीने लढू असंही त्यांनी सांगितलं आहे.

1
186 views