logo

मार्केट कमिटी फलटण विशेष निमंत्रित पदी शरद सर रणवरे यांची नेमणूक



श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार – मान्यवरांचे अभिनंदन

फलटण (प्रतिनिधी) : निकेश भिसे
फलटण मार्केट कमिटी विशेष निमंत्रित पदी श्री.बुवासाहेब सुशीला बबनराव रणवरे (उर्फ )शरद सर (उपसरपंच,जिंती,फलटण )यांची नेमणूक नुकतीच झाली असून, या नेमणुकीनंतर उद्या सर्वसाधारण सभेत त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे.

या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) निंबाळकर,माजी आमदार श्री.दिपकराव चव्हाण,श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (पिट्टूबाबा),श्रीमंत अनिकेतराजे आणि श्रीमंत बाळराजे यांनी शरद सर रणवरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

नेमणुकीच्या या निर्णयामुळे तालुक्यात आणि परिसरात आनंदाचे वातावरण असून, स्थानिक पातळीवर शेतकरी हितासाठी सातत्याने काम करीत असलेल्या शरद सर रणवरे यांच्या कार्याची दखल घेत ही नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

29
4338 views