logo

“सुप्रीम कोर्टाचा निर्णय “… गंजाड गावच्या सरपंचाचे त्वरित पुनर्स्थापना करण्याचे आदेश …..

पालघर जिल्ह्या मधील डहाणू तालुक्यातील श्री. अभिजीत उमाजी देसक दि.१६/१०/२०२० रोजीच्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत अनु. जमाती मधून गंजाड या गावचे थेट सरपंच म्हणून निवडून आले होते. निवडणूक निवडून आल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्यापासून श्री. अभिजित देसक यांच्या विरोधात स्थानिक असमाधानी राजकारण्यांनी खोट्या आरोपांची मालिका रचून राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न केला होता. कागदपत्रे बनवून श्री. अभिजित देसक यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले आहे, असे विरोधकांनी अतिक्रमधारक असल्याचे भासवून अभिजीत देसक यांना पदावरून दूर केले होते.
परंतु २३/०९/२०२५ च्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून तकारदारसह संबंधित अधिकारी, तहसीलदार , BDO, कलेक्टर तसेच कोकण आयुक्त आणि हायकोर्ट यांच्या कार्यपद्धतीवर कठोर असे ताशेरे ओढले. ( Qou) .
सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या बेंचने १) जस्टिस पमिदीघंटम, २) जस्टिस श्री. नरसिंम्हा व जस्टिस अतुल चांदूरकर यांनी श्री. अभिजित देसक यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून श्री. अभिजीत देसक यांची सरपंच या पदावर त्वरित पुनर्स्थापना करण्याचे आदेश दिले.
गावापासून सर्वोच्च न्यायालयत गेलेला वाद ! शेवटी न्यायालयाने न्याय मिळवून दिला असे श्री. अभिजीत देसक पुनर्स्थापित सरपंच यांचे म्हणणे होते. या कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या कुटुंबियांचे , मित्रांचे , ग्रामस्थांचे व शुभचिंतकांचे आभार त्यानी व्यक्त केले.

89
3463 views