
नेमळेतील सातेरी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम...
प्रतिनिधी. शशिकांत नाईक
सावंतवाडी, ता. २७: नेमळे येथील श्री देवी सातेरी मंदिरात
नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त भजन प्रेमी कला क्रीडा मित्र मंडळ, नेमळे यांच्या वतीने २९ सप्टेंबरला रात्री ९ वाजता "होम मिनिस्टर" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील प्रथम क्रमांकाच्या विजेतीस मानाची पैठणी देऊन गौरवण्यात येणार आहे तर द्वितीय क्रमांकाच्या विजेतीस मिक्सर, टेबल फॅन, खुर्चा, टी पॉय अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन भजन प्रेमी मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे.
तसेच रविवार, २८ सप्टेंबरला सायं. ६ ते ८ या वेळेत गावातील वारकरी मंडळाचा हरिपाठ, रात्री ८ ते ९ तारादेवी फुगडी ग्रुप, केळूस यांचा फुगडीचा कार्यक्रम, रात्री ९ ते १० क्षेत्रपालेश्वर फुगडी ग्रुप, होडावडे यांचा फुगडीचा कार्यक्रम, रात्री १० ते ११ क्षेत्रपालेश्वर दांडिया ग्रुप, होडावडे यांचा दांडिया, रात्री ११ ते १२ श्री देवी सातेरी ग्रुप, नेमळे यांचा दांडिया, सोमवार, २९ सप्टेंबरला रात्री ८ वाजता. श्री देव मलेश्वर सातेरी फुगडी ग्रुप, नेमळे यांची फुगडी आदी कार्यक्रम होणार आहेत. तरीही नेमळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.