logo

पांडुरंग परिवाराचे पंढरपूर मार्केट कमिटीचे माजी उप सभापती संतोष घोडके हे गोपाळपूर जिल्हा परिषद गटातुन इच्छुक

गत वेळेस बिनविरोध झालेल्या गोपाळपुर गटात अनेक इच्छुक असले तरी यावेळी पांडुरंग परिवाराचे कट्टर समर्थक प्रशांत परिचारक यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते पंढरपूर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती श्री संतोष घोडके हे या गटातून प्रबळ दावेदार आहेत.
श्री गोपाळ अंकुशराव यांच्या रूपाने गत वेळेस या गटातून बिनविरोध निवड झाली होती सध्या या गटातून अनेक जण इच्छुक असल्याचे जाणवत आहेत गोपाळपूर गटात तेरा गावे येत आहेत यामध्ये पुळुज आणि गोपाळपूर हे दोन पंचायत समितीचे गण येतात यामध्ये गोपाळपूर गणात चळे, आंबे ,कोंढारकी, मुंडेवाडी, गोपाळपूर हे तर पुळुज गणात पुळुज, पुळुजवाडी ,शंकरगाव, आंबे चिंचोली, फुलचिंचोली ,विटे, पोहरगाव , खरसोळी या गावांचा समावेश आहे
यावेळेस ओबीसी आरक्षण निघेल या आशेने अनेक इच्छुक भावी उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे संतोष घोडके यांनी मार्केट कमिटीच्या उपसभापती पदावर असताना अनेक लोकोपयोगी कामे केल्यामुळे आणि माननीय आमदार प्रशांतजी परिचारक यांच्या अति निकटचे कार्यकर्ते असल्याने त्यांना या वेळची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे
या गटात कायम स्वरूपी विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार यामध्ये लढत असते यावेळी मोहोळचे आमदार राजू खरे यांचा या मतदारसंघात समावेश असल्याने त्यांच्याही भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे
सध्या गोपाळपूर गटामध्ये पांडुरंग परिवाराकडून भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, पंढरपूर मार्केट कमिटीचे माजी सभापती संतोष घोडके, भीमाचे माजी संचालक रतिलाल गावडे ,बळीराम बनसोडे तर विठ्ठल परिवाराचे नेते आमदार अभिजीत पाटील गटाचे विठ्ठल पाटील, लिंगराज शेंडगे, संग्राम जाधव असे अनेक इच्छुक आहेत या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत आहे
या मतदारसंघांमध्ये आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे ,माआमदार प्रशांत परिचारक ,खासदार धनंजय महाडिक या सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

37
1710 views