राष्ट्रीय बंजारा क्रांती दलच्या जिल्हाध्यक्षपदी समाधान जाधव
चाकूर : राष्ट्रीय बंजारा क्रांती दलच्या जिल्हाध्यक्षपदी जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार हरिभाऊ राठोड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजू पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय बंजारा क्रांती दल, लातूर जिल्हाध्यक्षपदी समाधान जाधव यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
या संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जाधव यांनी प्रयत्न करावे असे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगून समाधान जाधव यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या निवडीबद्दल समाधान जाधव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.