logo

कुरकुंभ ता. दौंड एमआयडीसी मध्ये असणाऱ्या हार्मोनियम ऑरगॅनिक्स कंपनीचे केमिकल युक्त पाणी लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात. झगडेवाडीतील बाधित शेतकरी

कुरकुंभ (प्रतिनिधी. अनिल शितोळे)
कुरकुंभ एमआयडीसी मध्ये असणाऱ्या हार्मोनियम ऑरगॅनिक्स कंपनीचे केमिकल युक्त पाणी लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात येत आहे. दिनांक 19 .8. 2025 रोजी या कंपनीने त्यांचे 1लाख 39 हजार टीडीएसचे पाणी हे त्यांच्या संरक्षक भिंतीच्या वरून थेट बाहेर सोडले होते.त्याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी त्या पाणी सोडणाऱ्या व्यक्तीला जागेवर पकडले होते. त्यांचे पुरावे देखील शेतकऱ्यांकडे आहेत.
त्या रासायनिक पाण्याचा नमुना हार्मोनियम कंपनीच्या लॅबमध्ये चेक पणं केला आहे.त्यांची प्रत संबंधित शेतकऱ्यांकडे आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून या कंपनीच्या प्रदूषित पाण्याच्या त्रासाबाबत संबंधित शेतकऱ्यांनी कंपनीला वारंवार मुद्दा उपस्थित केला आहे. कंपनीकडून नेहमी असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले की आम्ही कंपनीमध्ये जमिनीवर आरसीसी करू बाहेर निघणाऱ्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करू असे आश्वासन कंपनी संबंधित शेतकऱ्यांना खूप वर्षापासून देत आहे. कंपनीने संबंधित शेतकऱ्यांकडून एक महिन्याची मुदत मागून यावर काय तरी उपयोजना करतो असे पोकळ आश्वासन देत आले आहे. परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे उपयोजना न करता बाधित शेतकऱ्यांची कायम फसवणूक करत आले आहे . यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी जाब विचारला असता हार्मोनियम कंपनीने बाधित शेतकऱ्यांना तुम्हाला जे काय करायचे ते करा आम्हाला कोणताही फरक पडत नाही. तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याकडे जावा आम्ही जे करायचे ते करणारच असे उत्तर वारंवार हार्मोनियम कंपनी प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना दिले आहे . संबंधित हार्मोनियम कंपनीच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे बोरवेल व विहीर यांची टी डी एस 3500 हजारापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती ही नापीक झाली आहे. संबंधित कंपनीवर काही कारवाई न झाल्यास बाधित शेतकरी प्रशासन विरुद्ध आणि हार्मोनियम कंपनी विरुद्ध आंदोलन केले जाईल.

19
1367 views