logo

वडवळचे सरपंच-उपसरपंच, चेअरमनसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश


सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसला मोठे खिंडार

शिरूर ताजबंद (ता. चाकूर), दि. १८ सप्टेंबर:
चाकूर तालुक्यातील वडवळ (नागनाथ) येथून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत सरपंच, उपसरपंच, चेअरमन आणि अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सहकार मंत्री तथा आमदार मा. बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. या प्रवेशामुळे स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच चाकूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये हे प्रमुख पदाधिकारी:

सरपंच: मुरली सोनकांबळे

उपसरपंच: बालाजी गंदगे

सोसायटी चेअरमन व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक: उमाकांत आचवले

ग्रामपंचायत सदस्य: महादेव सूर्यवंशी, रामलिंग बनवस्कर, बाबू भोजने

माजी व्हा. चेअरमन: हनमंत लवटे

सदस्य व कार्यकर्ते: अजमद पटेल, सिकंदर पटेल, सलीम उस्ताद, नजीर मुंजेवार, शिवराज आचवले, महादेव भेटे, जमीर पटेल, वाजीद पठाण, अख्तर पटेल, व अन्य ७० हून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी


या वेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सर्वांचे स्वागत व अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर:

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे

चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंतराव जाधव

तालुका उपाध्यक्ष सिद्धेश्वर अण्णा अंकलकोटे

युवक तालुकाध्यक्ष संदीप शेटे

अनिलराव वाडकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष आदित्य लवटे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

राजकीय चर्चा
या भक्कम पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठे खिंडार बसले असून, वडवळ परिसरातील राजकीय चित्र बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

1
91 views