logo

कुऱ्हा परिसरातील वादळी पाऊस व ढगफुटीग्रस्त भागाची पालक मंत्री यांनी केली पाहणी !

कुऱ्हा परिसरातील वादळी पाऊस व ढगफुटीग्रस्त भागाची पालक मंत्री गुलाब राव पाटील यांनी पाहणी केली.
पाचोरा प्रतिनिधी
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)
मुक्ताईनगर मतदारसंघातील कुऱ्हा परिसर व परिसरातील गावांमध्ये झालेल्या वादळी पाऊस व ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती,घरे व नागरिकांचे नुकसान झाले.

'या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील, महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री.संजयजी सावकारे,जळगाव जिल्हाधिकारी श्री.आयुषजी प्रसाद यांनी प्रत्यक्ष दौरा करत नुकसानीचे स्वरूप जाणून घेतले.यावेळी संबंधित तहसीलदार व अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून पीडितांना मदत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच आवश्यक त्या ठिकाणी नाले खोलीकरण,संरक्षण बांधकाम व आपत्कालीन उपाययोजना करण्याबाबतही प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
या पाहणी दरम्यान मंत्री महोदयांनी शेतकरी बांधवांशी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांना शासन आपल्या सोबत असल्याचा विश्वास दिला व त्यांच्या समस्या ऐकून तात्काळ योग्य निर्णय घेण्यात आले.
कुऱ्हा मार्केट, बोरखेडा जुने, राजुरा, हिवरा, जोंधनखेडा, धुळे, पावरीवाडा, चिंचखेडा खु॥,पारंबी आदी गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिकांशी संवाद साधला.

'याप्रसंगी तहसीलदार श्री.वखारे साहेब,भाजप नेते अशोकभाऊ कांडेलकर, जिल्हा संघटक सुनीलभाऊ पाटिल, शिवसेना उपजिल्हा प्रमुख छोटूभाऊ भोई, शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटिल, राष्ट्रवादी तालुका प्रमुख गोपाल पाटिल, उपतालुका प्रमुख पंकज पांडव, विभाग प्रमुख विनोद पाटिल, गटप्रमुख नारायण पाटिल, तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पाहणी दरम्यान मंत्री महोदयांनी स्पष्ट केले की, “नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन जनतेसोबत खंबीरपणे उभे आहे आणि कुणालाही मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही.”

3
25 views