शेतकरी चळवळीतील योगदानाची दखल : प्रा.पंढरी पाठे यांचा खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते सत्कार
यवतमाळ:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती,यवतमाळ येथे आज दिनांक १८ सप्टेंबर (गुरुवार) रोजी आयोजित कार्यक्रमात शेतकरी चळवळीतून सातत्याने आंदोलनात्मक कार्य करत असलेल्या प्रा.पंढरी पाठे यांचा यथोचित सत्कार व सन्मान यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा.ना.संजय भाऊ देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
प्रा.पाठे,कॉम्रेड सचिन मनवर,कृष्णा पुसनाके,विद्या परचाके,मंगला सोयाम,अभिलाष खंडारे,यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी,ओला दुष्काळ निवारण,हमीभाव,शेतीचे विजदर या प्रश्नांवर सतत रस्त्यावर उतरून आवाज उठवला आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी नेहमीच अग्रक्रमाने लढा दिला आहे.
या प्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड,वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर इंगळे,शिवसेना जिल्हाप्रमुख पिंटू शिंदे,जनसंपर्क अधिकारी हेमंत कांबळे,तुषार देशमुख,प्रवीण पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.