logo

Aima media jan Jan ki avaj दिनांक 18/09/2025 am 7:30 पुण्यात ११ किमीहून लांब डबलडेकरचा मार्ग, दुहेरी उड्डाणपुलावरुन मेट्रो; कुठून-कुठे, कशी असेल मार

Aima media jan Jan ki avaj
दिनांक 18/09/2025 am 7:30
पुण्यात ११ किमीहून लांब डबलडेकरचा मार्ग, दुहेरी उड्डाणपुलावरुन मेट्रो; कुठून-कुठे, कशी असेल मार्गिका?
Pune - Ahilyanagar Double Decker Flyover : पुणे-अहिल्यानगर मार्गावर दुहेरी उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिकेच्या कामाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. या मार्गाचा पुणेकरांना कसा फायदा होणार?पुणे : पुणे-अहिल्यानगर मार्गावर दुहेरी उड्डाणपूल आणि मेट्रोची मार्गिका या दोन्हीचे काम नक्की कोण करणार, याचा तिढा सोडवण्यात अखेर यंत्रणांना यश आले आहे. रामवाडी ते वाघोलीदरम्यानचे मेट्रोचे काम करतानाच, वाहनांसाठीच्या उड्डाणपुलासाठीची तयारी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) केली जाणार आहे. त्यानंतरच्या दुहेरी महामार्गांचं काम महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाकडून (एमएसआयडीसी) केले जाणार असले, तरी मेट्रोने वाघोलीपर्यंत केलेल्या कामाचा खर्च पायाभूत सुविधा महामंडळाला महामेट्रोला द्यावा लागणार आहे.पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील रामवाडी ते वाघोलीदरम्यानच्या (विठ्ठलवाडी) विस्तारित मार्गाला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे, पण पाच मार्गावर मेट्रोच्या आखणीतच (अलाइनमेंट) दुहेरी उड्डाणपुलाची उभारणी करण्यासाठी एमएसआयडीसीने निविदा काढल्याने वाघोलीपर्यंतचे काम नक्की कोण करणार, अशी समस्या निर्माण झाली होती.

10
1026 views