
Aima media jan jan ki avaj
दिनांक : 18/09/2025 am7:20
महाराष्ट्रातील पावणेदोन लाख डॉक्टर आज संपावर; काय कारण? मागण्या काय?
Maharashtra Doctors On Str
Aima media jan jan ki avaj
दिनांक : 18/09/2025 am7:20
महाराष्ट्रातील पावणेदोन लाख डॉक्टर आज संपावर; काय कारण? मागण्या काय?
Maharashtra Doctors On Strike: बाह्यरुग्ण आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा बंद राहणार असून, सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालयांमधील सर्व आपत्कालीन शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार आहेत. या संपाची झळ रुग्णांना बसण्याची शक्यता आहे.मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्यास परवानगी देण्याच्या निषेधार्थ, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या सर्वांत मोठ्या संघटनेशी संलग्न राज्यभरातील सुमारे एक लाख ८० हजार डॉक्टर आज, गुरुवारी संपावर जाणार आहेत.राज्य सरकारने ५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहे. आतापर्यंत परिषदेमध्ये केवळ आधुनिक वैद्यकशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेल्या ॲलोपॅथी डॉक्टरांची नोंदणी होत होती. मात्र नव्या निर्णयामुळे रुग्णहिताला बाधा निर्माण होण्याची भूमिका घेत, इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयाविरोधात एक दिवसाचा संप पुकारला आहे. राज्यातील एक लाख ८० हजार डॉक्टर यामध्ये सहभागी होणार आहेत.